🕒 1 min read
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या ‘थलायवी’ चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. कंगनाचा थलायवी चित्रपट रिलीज येत्या 10 सप्टेंबर रोजी म्हणजे कालच थिएटरमध्ये रिलीज झाला. मात्र कंगनाच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसत आहे. कंगनाच्या या सिनेमासाठी तामिळ आणि तेलुगु भाषेत थिएटर्स मिळाले परंतु हिंदी सिनेमासाठी अद्याप थिएटर्स उपलब्ध झाले नाहीत. ज्यामुळे कंगना राणौत पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबईत चित्रपटगृह न उघडल्याने कंगनाने महाराष्ट्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. याबाबत कंगनाने एक पोस्ट शेअर केली असून यामध्ये लिहिले की, महाराष्ट्र सरकार जोपर्यंत फिल्म इंडस्ट्रीमध्ये थिएटर कल्चर पूर्णपणे बंद होत नाही तोपर्यत चित्रपट गृहांवर बंदी ठेवणार आहे असं तिने आरोप केला आहे.

याठिकाणी अनेक सिनेमा चित्रपटगृहांच्या प्रतिक्षेत आहेत. कुणालाही कलाकार, निर्माते, डिस्ट्रीब्यूटर्स आणि चित्रपटगृह मालकांची चिंता नाही. फिल्म इंडस्ट्रीबद्दल राज्य सरकार वेगळी वागणूक देत आहे. आता बॉलिवूडने मौन बाळगण्याचं धोरण अवलंबलेलं दिसत आहे. कुणीही जगातील सर्वात बेस्ट सीएमला प्रश्न विचारु शकत नाही अशी वृत्ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची आहे असा आरोपही कंगना राणौतनं केला आहे.
दरम्यान, ‘थलायवी’च्या हिंदी व्हर्जनने तीन दिवसांत फक्त 1 कोटींचा बिझनेस केला. पहिल्या दिवशी 25 लाख, शनिवारी 30 लाख आणि रविवारी 45 लाखांची कमाई झाली. ‘बेलबॉटम’सोबत तुलना केल्यास अक्षयच्या सिनेमाने पहिल्या वीकेंडला देशभरात 15 कोटींचा बिझनेस केला होता. ‘बेलबॉटम’पेक्षा देखील कमी कंगनाच्या चित्रपटाची जादू पाहायला मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुंबई : ‘सेरो सर्वेक्षणा’त ८६.६४ टक्के नागरिकांमध्ये आढळून आल्या अॅण्टीबॉडीज्
- ‘भाजपात एकमेव मोदींचा चेहरा, बाकी सारे नाचरे मुखवटे’ शिवसेनेची टीका
- ओबीसी राजकीय आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकार सुप्रीम कोर्टात, 23 सप्टेंबरला सुनावणी
- कोविड उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील GST ची सवलत येत्या 31 डिसेंबरपर्यंत वाढवली
- मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; रेल्वेची सुरक्षा वाढवली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
