मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वाराणसीतील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी भावुक झाले होते. कोरोनाशी दोन हात करताना आपण या लढाईत अनेक जवळच्या लोकांना गमावलं आहे, असं मोदी म्हणाले. डॉक्टरांसोबत बोलताना मोदींचा हुंदका देखील फुटला.
मात्र, यानंतर आता सर्वांनी मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींच्या या रडण्याची सर्वाधिक चर्चा सोशल मीडियावर दिसून आली. मोदींचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल नेटवर्किंगवर ऑस्कर्स हा हॅशटॅग ट्रेण्ड होऊ लागला. त्यांना ऑस्कर्स पुरस्कार द्या अशी टीका अनेकांनी केल्यामुळे OSCAR हा शब्द ट्रेण्डमध्ये आला आहे.

आता यावर कंगना राणौतची प्रतिक्रिया आली आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर एक लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. ‘अश्रू खरे होते वा खोटे… तुम्ही टिअर डिटेक्टर टेस्टमध्ये गुंतून राहणार आहात की दुस-याचे दु:ख बघून तळमळणा-या व्यक्तिच्या भावना स्वीकारणार आहात. वेदना असहनीय होतात तेव्हा त्या व्यक्त कराव्याच लागतात. हे दु:ख वाटावेच लागते. मी तुमचे अश्रू स्वीकातेय… पंतप्रधान मोदीजी मी तुम्हाला तुमचे दु:ख शेअर करू देईऩ…प्रियभारतीयांनो प्रत्येक आशीर्वाद समस्या समजू नका. स्वत:चे अॅटिट्यूट आणि विचार स्वत: ठरवा, असे कंगनाने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- निष्काळजीपणा शिगेला! ऑक्सिजन बंद पडलं, सांगून सुद्धा दुर्लक्ष
- वयाच्या ४५व्या वर्षी ‘या’ खेळाडूने केली शतकीय खेळी, चौकार आणि षटकारांचा पाडला पाऊस
- मोदी सरकार ‘ट्विटर’च्या भूमिकेवर नाराज, एकतर्फी निर्णय न घेण्याचा सल्ला
- आयपीएल स्थगित झाली नसती तर मी पण स्पर्धा अर्ध्यातून सोडली असती : युजवेंद्र चहल
- काँग्रेस राज्यभरात देणार १११ ॲम्ब्युलन्ससह ६१ लाख मास्क, नाना पटोले यांची माहिती


