मुंबई : काल (२४ मार्च) विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील सफाई कामगार, झोपडपट्टीवासीयांसह ३०० आमदारांना घरं देणार असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर ठाकरे सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. दरम्यान, याच मुद्द्यावरून आता भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना चंद्रकांत पाटील म्हणाले की,‘आमदार पळून जातील आणि सरकार पडेल या भीतीनेच हा वर्षाव केला जात असून मुंबईत माझ्यासारखे आणि सदाभाऊ खोत यांच्यासारखे सोडले तर प्रत्येकाची चार चार घरं आहेत.’ तसेच दोन कोटींचा आमदार निधी कोरोना असतानाही चार कोटी केला, आता पाच कोटी केला. कशासाठी घरं पाहिजेत?’, असा सवालही पाटलांनी यावेळी केला.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविषयी नापसंती व्यक्त केली असून यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना संजय राऊत म्हणाले की,‘आमदारांच्या घरांच्यासंदर्भात माझी मते वेगळी आहेत. माझाही भाऊ आमदार आहे. परंतु मला घर नको आहे. मी याबाबत बोलणार नाही. माझे मत वेगळे आहे.’
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ निर्णयावर संजय राऊतांची असहमती; म्हणाले…
- दिशा सालियनची हत्याच! लवकरच CBI कडे पेनड्राईव्ह देणार; नितेश राणेंचा इशारा
- OMG..! अचानक स्क्रीनवरून गायब झाले हर्षा भोगले; VIDEO पाहून तुमचाही जीव पडेल भांड्यात!
- …त्यापेक्षा सर्वसामान्यांना २०० युनिट मोफत वीज द्या- राजू पाटील
- “…वरून शक्ती कायद्याची अंमलबजावणी कितपत होईल याची शंका”, चित्रा वाघ यांचा ठाकरे सरकारवर निशाणा

