Share

पुनर्वसित गावांचा विकास करणार-मंत्री संदीपान भुमरे

Published On: 

औरंगाबाद : पुनर्वसित गावांचा विकास तसेच समस्यांबाबत पैठणचे आमदार तथा मंत्री संदीपान भुमरे यांनी नुकतीच पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेतली. पैठण तालुक्यातील पुनर्वसित गावांच्या विकासासाठी भूकंप व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेत पुनर्वसन विभागांच्या अधिकाऱ्यांची मंत्रालय येथे बैठक घेण्यात आली.

भुमरे यांनी मांडलेल्या कामाबाबत सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन यावेळी पुनर्वसन मंत्र्यांनी दिले. तसेच उपस्थित अधिकाऱ्यांना या गावांचा आढावा घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. पैठण येथे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण असून या महाकाय जलाशयाने शेकडो गावे व हजारो एकर शेती आपल्या कवेत घेतली.

धरणासाठी आपली घरे, शेती देऊन तालुक्यात इतरत्र विस्थापित झालेल्या नागरिकांचे शासनातर्फे पुनर्वसन करण्यात आले. अशा पुनर्वसित गावांचे अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान व गावांच्या विकासाठी भुमरे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन लक्ष घातल्यामुळे पुनर्वसित गावातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!