पुणे : एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शरजिल उस्मानी विरोधात सोमवारी भाजपनं तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील स्वारगेट पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला याआधीच अनेकांनी विरोध केला होता. मात्र, पुणे पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर एल्गार परिषद ३० जानेवारीला पार पडली.
शरजिल उस्मानी याने पुणे येथील एल्गार परिषदेत भाषणाची सुरुवात करतानाच, ‘आजचा हिंदू समाज सडला आहे. मी इथे एक अल्पसंख्याक तरुण म्हणून आलो असून युद्धाची सुरुवात करण्यासाठी आलो आहे,’ असे आक्षेपार्ह विधाने त्याने केली होती. यावरून आता भाजपने आक्रमक भूमिका घेत अजूनही राज्य सरकार व पोलीस कारवाई का करत नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.
एल्गार परिषदेमध्ये आमंत्रित करण्यात आलेला 24 वर्षीय शरजील उस्मानी हा अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी नेता आहे. सीएए आणि एनआरसी या कायद्यांविरोधात केलेल्या आंदोलनासाठी तो ओळखला जातो. सीएए-एनआरसी या कायद्यांविरोधात केलेल्या आंदोलनाबाबत बोलण्यासाठी शरजीलला एल्गार परिषदेमध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं.
15 डिसेंबर 2019 रोजी अलिगढ मुस्लिम विद्यापीठामध्ये सीएए-एनआरसी या कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनावेळी झालेल्या संघर्षामध्ये त्याचा सहभाग असल्याच्या आरोपांवरून त्याला उत्तर प्रदेश पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. सध्या तो जामीनावर बाहेर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शरजील उस्मानीचे वडील डॉ. तारिक मोहम्मत उस्मानी हे AMU मध्ये M.Sc विभागात असोसिएच प्रोफेसर आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ‘तिजोरीला खडखडाट फक्त जनतेसाठी; मंत्र्यांच्या अय्याशीसाठी पैशाची कमी नाही’
- डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांची गय करणार नाही – पोलिस आयुक्त निखील गुप्ता
- अभिमानास्पद : नासाची दोर आता भारतीयाच्या हातात, भव्या लाल यांची कार्यकारी प्रमुखपदी नियुक्ती
- शेतकऱ्यांसमोर तर ब्रिटीशांनाही झुकावं लागलं होतं; गुलाम नबी आझाद यांचा हल्लाबोल
- नवीन आर्थिक वर्षासाठी २४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर; १०० कोटींची अतिरीक्त मागणी


