Share

माजी आ.हर्षवर्धन जाधव यांच्या मैत्रिणीचा विनयभंग, गुन्हा दाखल

Published On: 

औरंगबाद : जिल्ह्यातील कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जाधव यांना मारहाण करून त्यांच्या मैत्रिणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा पुण्यातील चतुःशृंगी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. न्यायालायच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनूसार, ३७ वर्षीय महिलेने याबाबत तक्रार दिली होती.त्यानुसार अमन चढ्ढा, करण चढ्ढा, ममता चढ्ढा, अजय चढ्ढा, मनीष आनंद (रा. खडकी बाजार) आणि अन्य दोन अनोळखी व्यक्तींसह आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औंध येथील ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या शाखेसमोर १४ डिसेंबरला सायंकाळी सात ते रात्री साडेआठच्या दरम्यान ही घटना घडली. चढ्ढा यांनी केलेल्या तक्रारीत जाधव यांनी ज्येष्ठ दाम्पत्याला बेदम मारहाण केल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी पुढील चौकात आणखी एका वाहनचालकाला धडक दिल्याने त्यांना जमावाने अडवून मारहाण केली होती. याप्रकरणी जाधव यांना अटक करण्यात आली होती. आपल्यालाही मारहाण झाल्याचे जाधव यांनी सांगूनही त्यांची तक्रार पोलिसांनी घेतली नाही. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली.

तक्रारीत म्हटले आहे की, औंध परिसरात  त्यांनी कार उभी केली होती. कारचा दरवाजा उघडला असता, पाठीमागून अजय चढ्ढा आणि ममता चढ्ढा यांनी धडक दिली. त्यानंतर मोठ्याने ओरडून तक्रारदारांना शिवीगाळ केली. अजय चढ्ढा यांनी जाधव यांच्या मैत्रिणीचा विनयभंग करून थोबाडीत मारली. त्यानंतर तक्रारदार आणि जाधव औंध चौकात गेले असता त्यांची गाडी अडवून चावी जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर अमन चढ्ढा, करण चढ्ढा आणि मनीष आनंद यांनी विनयभंग करून तक्रारदारांना मारहाण केली, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!