मुंबई : टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी आणि त्याची मुलगी सोशल मिडिया वर नेहमीच चर्चेत असतात. झिवाचं वेगळं इन्स्टाग्राम अकाऊंट आहे. झिवाची आई साक्षी हे अकाऊंट चालवते. झिवाला तब्बल 1.8 मिलियन फॉलोअर्स आहेत.
सध्या याच झीवाच्या अकाऊंटवरून एक व्हिडीओ खूप चर्चेत आहे. कारण या व्हिडीओ मध्ये धोनीची मुलगी झीवा बाबांप्रमाणे भाज्यांमध्ये रमली झिवा भाज्यांसमोर बसली आहे. या सर्व भाज्या तिनं स्वत: शेतामधून निवडल्या आहेत. साक्षी तिला या भाज्यांचं नावं विचारते. त्यावेळी झिवा त्या सर्व भाज्यांचं नाव अचूक सांगते. त्यानंतर झिवा तिच्याला आईला आपली आवडती भाजी गाजर असल्याचं सांगते. झिवाचा हा गोड व्हिडीओ तिच्या फॅन्समध्ये चांगलाच लोकप्रिय झाला आहे.
https://www.instagram.com/p/CKtVf-dHEsf/?utm_source=ig_web_copy_link
१५ ऑगस्ट २०१९ मध्ये धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर इंडियन टीमचा कूल कॅप्टन आता सेंद्रीय शेतीकडे वळला आहे. या शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची लागवड धोनी करतो. मध्यंतरी धोनीचे शेती करतानाचे फोटो देखील व्हायरल झाले होते. त्याचप्रमाणे धोनीची टीम आता डेअरी क्षेत्रातही उतरली आहे. सहीवाल जातीच्या गाई धोनी टीमने विकत घेतल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पॉपस्टार रीहानाच्या शेतकरी आंदोलनावरील ट्विटला माजी क्रिकेटपटूचे प्रतिउत्तर !
- काकांनी आता निवृत्त व्हावे; पुतणे आशिष यांचा अनिल देशमुखांना घरचा आहेर
- ‘एल्गार परिषदेच्या आडून जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव’
- अत्याचार पीडितेची ओळख सांगू नका, औरंगाबाद खंडपीठाचे माध्यमांना निर्देश
- आरक्षण भूसंपादनाबाबत शिवसेनेचे दुटप्पी धोरण- भालचंद्र शिरसाट


