Share

एलआयसीच्या खासगीकरणामध्ये पॉलिसीधारकांना मिळणार मालक होण्याची संधी !

Published On: 

नवी दिल्ली : कोरोना या जागतिक महामारीच्या काळामध्ये जगातील सर्च राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थांना मोठा आर्थिक फटका बसल्याने मंदीच्या छायेत आहेत. याला भारतीय अर्थव्यवस्था देखील अपवाद नाही. आता अनलॉक प्रक्रीये दरम्यान अर्थव्यवस्था हळू हळू रुळावर येत आहे. सरकार देखील अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी पावले उचलत आहे.

१ फेब्रुवारी ला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प जाहीर केला यामध्ये त्यांनी दोन राष्ट्रीयीकृत बँका तसेच एक सर्वसाधारण विमा कंपनीचे खासगीकरण करण्याचे जाहीर केले. मात्र यामुळे सरकारी मालमत्तांचे खासगीकरण झाल्याने उद्योजकांच्या हातात सर्व काही जाईल. कामगारांचे हित जोपासले जाणार नाही. काही सामाजीक वस्तू व सेवा ह्या मुख्यता शासनाच्या हातात असाव्या, जेनेकरून प्रत्येकाला त्यांचा लाभ मिळेल जसे की कायद्याची अंमलबजावनी, आरोग्य सेवा, व मूलभुत शिक्षण

दरम्यान. सरकारकडून एलआयसी पॉलिसी धारकांसाठी खूशखबर देण्यात आली आहे. कारण सरकार या पॉलिधारकांसाठी १० टक्के प्रस्तावित आयपीओ राखीव ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. यामुळे पॉलिसीधारकांना एलआयसीचे भागीदार मालक बनण्याची संधी मिळणार आहे.

गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता नियंत्रण विभागाचे सचिव तुहिन कांता पांडे यांनी टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हटलं, “एलआयसीचे आयपीओ बाजारात आणताना कायद्यात आम्ही पॉलिसीधारकांसाठी काहीतरी ऑफर देणार आहोत. पॉलिसीधारकांना आम्ही भागधारक होण्याची संधी देणार आहोत. म्हणजेच त्यांच्यासाठी आम्ही १० टक्क्यांपर्यंत आपीओ ऑफर करु शकतो”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!