मुंबई:- भाजपासोबतची युती तुटल्याने मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेसमोर खूप मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेने आतापासूनच मुंबई महापालिका जिंकण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
शिवसेनेने यासाठी अमराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असं म्हणत शिवसेनेने गुजराती मतदारांना साद घातली आहे. दरम्यान एका बाजूला भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे तर दुसऱ्या बाजूला शिवसेना देखील अमराठी मतांसाठी जोरदारपणे तयारीला लागली आहे.
दरम्यान आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं गुजराती, मारवाडी मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी कंबर कसली आहे. येत्या ७ फेब्रुवारीला शिवसेनेनं मालाडमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. यावेळी २१ गुजराती उद्योजक, व्यापारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. याशिवाय गुजरातीबहुल भागांमध्ये शिवसेना रासगरबादेखील आयोजित करणार आहे.
मुंबई उपनगरात काही भागांत गुजराती, मारवाडी समाजाचं प्राबल्य आहे. मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये ही मतं निर्णायक ठरू शकतात. या एकगठ्ठा मतांमुळेच मालाड, कांदिवली, बोरिवली भागांत भाजपचं वर्चस्व आहे. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये हे दिसून आलं आहे. त्यामुळे आता या मतपेढीला आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न शिवसेनेनं सुरू केले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पॉपस्टार रीहानाच्या शेतकरी आंदोलनावरील ट्विटला माजी क्रिकेटपटूचे प्रतिउत्तर !
- काकांनी आता निवृत्त व्हावे; पुतणे आशिष यांचा अनिल देशमुखांना घरचा आहेर
- ‘एल्गार परिषदेच्या आडून जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव’
- अत्याचार पीडितेची ओळख सांगू नका, औरंगाबाद खंडपीठाचे माध्यमांना निर्देश
- आरक्षण भूसंपादनाबाबत शिवसेनेचे दुटप्पी धोरण- भालचंद्र शिरसाट


