कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात भाजप आणि तृणमूल यांच्यात जोरदार घमासान सुरु आहे. तृणमूल कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे एक तक्रार केली आहे. तृणमूलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
पंतप्रधानांचा बांगलादेश दौरा राजकीय हेतूने प्रेरित होता, असा आरोप तृणमूल कॉंग्रेसने केला आहे.टीएमसीचे राज्यसभेचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी जारी केलेल्या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 आणि 27 रोजी 50 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी बांगलादेशात गेले होते. बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळविण्यात भारताने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याने टीएमसीने मोदींच्या या अधिकृत भेटीला विरोध केला नाही परंतु टीएमसीने बांगलादेशात 27 रोजी पंतप्रधानांच्या कार्यक्रमास विरोध दर्शविला.
टीएमसीने म्हटले आहे की पंतप्रधानांनी बांगलादेशातील मातुआ समाजातील लोकांना आमिष दाखवण्याचा प्रयत्न केला. टीएमसीने पंतप्रधानांच्या मंदिराच्या भेटीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.टीएमसीने असा आरोप केला आहे की बांगलादेशातील पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचा उद्देश बंगालमधील सुरू असलेल्या निवडणुकांवर परिणाम व्हावा असा होता.
आजपर्यंत कोणत्याही पंतप्रधानांनी दुसऱ्या देशाच्या भूमीतून प्रचार करून आदर्श आचारसंहितेचा भंग केलेला नाही. टीएमसीने निवडणूक आयोगाला पंतप्रधानांच्या बांगलादेश दौऱ्याच्या दुसऱ्या दिवसाच्या माध्यमांच्या कव्हरेजच्या लिंक देखील शेअर केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- उस्मानाबाद जिल्हा; एसटी महामंडळाच्या उत्पन्नात मोठी घट!
- ‘रिषभ जर असाच खेळत राहिला तर तो ‘या’ दोघांनाही मागे टाकेल’
- शार्दुल-भुवनेश्वरला पुरस्कार न मिळाल्याने विराट भडकला, म्हणाला…
- पोटात दुखू लागल्याने खा.शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला कोव्हिड वॉर रुमचा आढावा


