Share

‘रिषभ जर असाच खेळत राहिला तर तो ‘या’ दोघांनाही मागे टाकेल’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडवर 7 धावांनी विजय मिळवला. शेवटच्या षटकांत इंग्लंडला विजयासाठी 6 चेंडूत 14 धावांची आवश्यकता होती, मात्र नटराजनने अचूक गोलंदाजी करताना केवळ 6 धावा दिल्या आणि भारताने विजय साकार केला. या विजयासह भारताने 3 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली.

भारतीय संघाची सुरुवात ही चांगली झाली. सलामीच्या जोडीने शतकी भागिदारी केल्याने भारतीय संघाची स्थिती मजबूत झाली. संघाच्या १०३ धावा झाल्यानंतर रोहित शर्मा बाद झाला. यानंतर लगेचच शिखर धवन व कर्णधार विराट कोहली देखील माघारी परतले. यानंतर, के एल राहुल व रिषभ पंतने चांगली भागिदारी रचण्याचा प्रयत्न केला मात्र ७ धावा करून संघ १५७ धावांवर असताना राहुल देखील बाद झाला.

तर, रिषभ पंत व हार्दिक पांड्याने भारतीय संघासाठी आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यासाठी मोठं योगदान दिलं. तब्बल ४ षटकार व ५ चौकार ठोकत रिषभने ६२ चेंडूंमध्ये ७८ धावा केल्या. मागील सामन्यात देखील पंतने षटकारांचा पाऊस पाडला होता. तर, या सामन्यात देखील पंतच्या आक्रमक खेळीने इंग्लंडच्या संघाची दाणादाण उडाली होती. तो शतकी खेळी करेल अशी अपेक्षा चाहत्यांना होती. मात्र, सॅम कुरण च्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला.

दरम्यान रिषभ पंत ज्या प्रकारे स्वतःला व्यक्त करतो. त्याच्याकडे ज्या प्रकारचे त्याचे शाॅट्स आहेत, असे मी गेल्या 30-35 वर्षात दोनच यष्टीरक्षक फलंदाज पाहिले आहेत. एक म्हणजे एम.एस. धोनी आणि दुसरा म्हणजे एडम गिलख्रिस्त. हे दोन यष्टीरक्षक फलंदाज सामना बदलून टाकायचे. रिषभ जर असाच खेळत राहिला तर तो या दोघांनाही मागे टाकेल, असा विश्वास पाकिस्तानचा खेळाडू इंजमाम उल हक याने दाखवला आहे.

रिषभ पंतने भारतासाठी लोवर ऑर्डरमध्ये महत्वाची भुमिका बजावली आहे. त्याने 40 चेंडूत 77 धावांची खेळी केली होती. त्यामुळेच भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. मी त्याला गेल्या 6-7 महिन्यांपासून फाॅलो करत आहे. ज्याप्रकारे तो वेगवेगळ्या क्रमांकावर येऊन फलंदाजी करतो ते अप्रतिम आहे, असं इंजमाम पुढे म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!