मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं समोर आलं आहे.
शरद पवार यांची प्रकृत्ती स्थिर असल्याचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं. नवाब मलिक यांनी ट्विट करून शरद पवार यांच्या प्रकृतीची माहिती दिली.
मलिक आपल्या ट्वीटमध्ये म्हणतात,पवारांच्या पोटात दुखू लागल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान झालं. त्यामुळे पवार यांना 31 मार्चला रुग्णालयात अॅडमिट करण्यात येणार आहे. शरद पवारांवर एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाईलअशी माहिती मलिक यांनी दिली आहे.
He is on Blood Thinning Medication which is now being stopped due to this issue.
He will be admitted in hospital on the 31st of March 2021 and an Endoscopy and Surgery will be conducted.
Hence all his programmes stand cancelled until further notice.@PTI_News @ANI— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) March 29, 2021
पवार हे सध्या सुरु असलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये प्रचारसभा घेणार होते. पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये त्यांचे प्रचार दौरे नियोजित होते. मात्र आता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत असल्याने, पुढील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- ये बॅट हमको दे, दे ठाकूर ; शार्दुलच्या शानदार षटकारावर स्टोक्स फिदा
- ‘रिषभ जर असाच खेळत राहिला तर तो ‘या’ दोघांनाही मागे टाकेल’
- शार्दुल-भुवनेश्वरला पुरस्कार न मिळाल्याने विराट भडकला, म्हणाला…
- विजयाचा गुलाल लावत टीम इंडियाची होळी साजरी
- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला कोव्हिड वॉर रुमचा आढावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

