Share

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला कोव्हिड वॉर रुमचा आढावा

Published On: 

औरंगाबाद :  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गोंदावले यांनी रविवारी कोव्हिड १९ वाररूम ,जिल्हा परिषद औरंगाबाद येथे भेट देऊन वार रूम मधील कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यामध्ये जिल्ह्यातील सर्व कोव्हिड केअर सेंटर्स सद्यस्थिती, दाखल रुग्ण, उपलब्ध खाटा याबद्दलची माहिती घेतली.

दरम्यान ही माहिती रुग्णांपर्यंत पोचवण्यासाठी ची व्यवस्था कशा प्रकारे राबविली जात आहे याचीही माहिती घेतली. रूम मधील संपर्क क्रमांक 0240 29 54 616 असा आहे. याशिवाय ग्राम स्तर,उपकेंद्र स्तर, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तर व तालुका स्तरावर कोव्हिड प्रतिबंधक उपाय योजना कशा प्रकारे राबविण्यात येतात, अहवाल कशाप्रकारे प्राप्त होतो, त्याचे संकलन करून वरिष्ठ शासकीय कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय व विभागीय आयुक्त कार्यालय येथे कशाप्रकारे दैनंदिन स्वरूपात सादर केल्या जातो या सर्व बाबींचा  मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सविस्तर आढावा घेतला. वाररूम मधील अधिकारी तसेच कर्मचारी त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व त्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिले.ग्रामीण भागामध्ये रुग्ण संख्या वाढू नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देशही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या वेळी दिले आहेत.

केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध स्तरावर आढावा घेतला जातो. त्यामध्ये वाररूम मधील माहितीवरच हा आढावा अवलंबून असतो. त्यामुळे या माहितीमध्ये काही त्रुटी राहू नयेत. या संबंधाने नियोजन करण्यात आले. यावेळीअतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कवडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके,डॉ. कुडलीकर, डॉ.गंडाळ , डॉ. बारडकर व इतर सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!