Share

उस्मानाबाद जिल्हा; एसटी महामंडळाच्या उत्पन्नात मोठी घट!

Published On: 

उस्मानाबाद: जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव आणि शेजारच्या जिल्ह्यात लागलेल्या संचारबंदीचा फटका उस्मानाबाद जिल्ह्यातील एसटी महामंडळाला असला असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या सेवेत तत्पर असणारी राज्य परिवहन महामंडळाची एसटी कोरोनापुढे मात्र हतबल झाल्याचे दिसत आहे. मागील वर्षी मार्च महिन्यापासून सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजविल्याने देश लॉकडाऊन करण्यात आला. यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. यात लालपरीची चाकेही रूतली.

दरम्यान, अनलॉकनंतर टप्प्याटप्प्याने सर्व व्यवहार सुरळीत होऊ लागले. एसटी महामंडळाने देखील हळूहळू ग्रामीण भागापर्यंत आपली सेवा पूर्ववत सुरू केली. आता कुठे एसटीची सेवा सुरळीत सुरू झालेली असतानाच मागील दोन महिन्यांपासून पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. यामुळे विविध क्षेत्रावर याचा परिणाम जाणवत आहे.गतवर्षी याच काळत ९ महिने लॉकडाऊन असल्यामुळे लालपरीची चाके रुतली होती. त्यामुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला.

मागील काही महिन्यात एसटी महामंळाला प्रवासी सेवेतून दैनंदिन ६ लाख रुपये उत्पन्न सुरू झाले आहे. कोरोना संकटापूर्वी दैनंदिन ९ लाख ५० हजाराचे उत्पन्न होते. दररोज पूर्वी २९ हजार किलोमीटर ही लालपरी धावत होती. आजघडीला ती २४ हजार किलोमीटर धावत आहे. मागील महिन्यांपासून पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे बसस्थानकात प्रवाशांची वर्दळ कमी झाली आहे. उमरगा स्थानकातून विविध मार्गावरील बसफेऱ्या सुरू असून, दररोज सुमारे १४ हजार हजार प्रवासी प्रवास करीत आहेत. यातून दैनंदिन उत्पन्न ६ लाखांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महामंडळ आर्थिक उत्पन्न कमी झाले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!