Share

‘टिपूसेना बनलेली शिवसेना रझा अकादमीच्या पिल्लांच्या भूमिकेत दिसतेय’

Published On: 

मुंबई : रझा अकादमी हे भाजपाचे पिल्लू असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी औरंगाबादेत केले आहे. त्यावर भाजपा नेते आक्रमक प्रतिक्रिया देत आहेत. भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी तुर्तास टिपूसेना बनलेली शिवसेना, रझा अकादमीच्या पिल्लांच्या भूमिकेत दिसते आहे, असे प्रत्युत्तर संजय राऊतांना दिले आहे.

त्रिपुरा दंगलीचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्यामागे भाजपचाच हात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. देशभरात वाढलेल्या महागाईविरोधात संजय राऊत यांच्या नेतृत्वात आज औरंगाबादमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी राऊत बोलताना म्हणाले, ज्या रझा अकादमी संघटनेद्वारे हे लोण पसरवलं जातंय, त्यामागे कोणता पक्ष आहे, हे सर्वश्रुत आहे.

अनेक वर्षांपासून या संघटनेला भाजपचेचे खतपाणी आहे. आज महाराष्ट्रात सुरु असलेल्या जाळपोळ आणि दंगलींमागे कोण आहे, हे यावरून स्पष्ट होते. रझा अकादमी हे भाजपचंच पिल्लू आहे. त्यामुळे त्यांच्याच पाठिंब्याने त्रिपुरातलं लोण इथवर पोहोचलं आहे. अन्यथा तिकडे त्रिपुरात घडलेल्या दंगलींचे पडसाद इकडे उमटण्याचे काय कारण? असा सवालही संजय राऊतांनी केला आहे.

त्रिपुरातील हिंसेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोर्च काढण्यात आले होते. या मोर्चादरम्यान काही जिल्ह्यात तणाव निर्माण झाला आहे. अमरावती, नांदेड, परभणी, मालेगाव, नाशिकमध्ये मुस्लिमांनी प्रचंड मोर्चे काढत जोरदार आंदोलन केलं आहे. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. जमावाने पोलिसांवरच दगडफेक केल्याने पोलिसांनीही जमावाला पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला होता.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!