🕒 1 min read
नवी-दिल्ली : काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांच्या ‘सनराईस ओव्हर अयोध्या’ या पुस्तकात खुर्शीद यांनी हिंदुत्ववादी संघटनांची तुलना थेट दहशतवादी संघटना ईसीस आणि बोको हरमसोबत केली आहे. त्यामुळे या पुस्तकावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून खुर्शीद यांच्यावर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणावर खुर्शीद यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आपली भूमिका स्पष्ट करत खुर्शीद म्हणाले की,’मी या लोकांना दहशतवादी म्हणालेलोच नाही. मी फक्त म्हणालो आहे की ते धर्माचा विपर्यास करण्यात सारखे आहेत. हिंदुत्वानं काय केलंय, तर सनातन धर्म आणि हिंदुत्ववादाला बाजूला सारलं आहे. आणि बोको हराम आणि आयसिसप्रमाणेच त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे, असं मी पुस्तकात म्हटलं आहे.’ तसेच मला इतर कुणीही त्यांच्यासारखं दुसरं दिसलं नाही. मी म्हटलं ते त्यांच्यासारखे आहेत. एवढंच याचा हिंदुत्ववादाशी काहीही संबंध नाही. हिंदुत्वाच्या समर्थकांकडून ज्या पद्धतीने त्याचा प्रचार केला जातोय, ते म्हणजे धर्माचा विपर्यास आहे, असे देखील ते म्हणाले आहेत.
दरम्यान, ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाईम्स’ या पुस्तकातल्या ‘द सॅफ्रॉन स्काय’ या प्रकरणामध्ये सलमान खुर्शिद यांनी ही तुलना केली आहे ‘ऋषीमुनी आणि संतांच्या परंपरेसाठी ओळखला जाणारा सनातन धर्म आणि हिंदुत्व गेल्या काही वर्षांत हिंदुत्वाच्या आक्रमक स्वरुपामुळे बाजूला सारलं गेलं आहे. हे आक्रमक हिंदुत्व आयसिस, बोको हरामसारख्या जिहादी इस्लामिक गटांच्या राजकीय स्वरुपासारखंच आहे’, अशा आशयाचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- एस. टी. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा- राज ठाकरे
- जय श्री राम म्हणणारे मुनी नाही, तर राक्षस; काँग्रेस नेते राशीद अल्वींचं वादग्रस्त वक्तव्य
- पीएमआरडीच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय; सेना-राष्ट्रवादीलाही यश, काँग्रेस मात्र…
- ‘कंगनाच्या सौंदर्यासमोर काहींना स्वातंत्र्य आंदोलनातील शहीदांचा अपमान ही जाणवत नाही का?’
- ‘जेपी नड्डांनी कर्णपिशाच्चांच्या नादाला लागू नये, नाहीतर भाजप महाराष्ट्रातून नष्ट होईल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
