सांगली : एकरकमी ‘एफआरपी’साठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून मध्यरात्री कार्यकर्त्यांकडून राजारामबापू व क्रांती सहकारी साखर कारखान्याच्या दोन ट्रॅक्टरला आग लावण्यात आली आहे. त्यामुळे आता आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार राजारामबापू कारखान्याचे सर्वेसर्वा पालकमंत्री जयंत पाटील असून क्रांतीचे अध्यक्ष आ. अरूण लाड व विश्वासचे अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक आहेत. एकरकमी एफआरपी मिळावी अशी स्वाभिमानीची मागणी असून या मागणीला कोल्हापूर जिल्ह्य़ात सकारात्मक प्रतिसाद मिळाला. पंरतु सांगली जिल्ह्य़ात दालमिया व दत्त इंडिया हे दोन कारखाने वगळता प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे स्वाभिमानीचे कार्यकत्रे आक्रमक झाले आहेत.
दरम्यान, यासंदर्भात माध्यमांशी संवाद साधतांना स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले की, ‘कारखान्यांना एकरकमी एफआरपी जाहीर केल्याविना कारखाने सुरू करू दिले जाणार नाहीत. दत्त इंडिया व दालमिया खासगी असून एकरकमी देण्याचे मान्य करतात. मग इतकी वर्षे सहकारात साखर कारखाने चालू असताना शेतकऱ्यांचे पैसे द्यायच्या वेळीच आर्थिक अडचणी का सांगितल्या जातात. हे कारखानदार शेतकऱ्यांना लुटण्याचा उद्योग करीत आले असून हे यापुढे सहन केले जाणार नाही.’
महत्वाच्या बातम्या
- एस. टी. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा- राज ठाकरे
- पुस्तकाच्या वादावर सलमान खुर्शिद यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
- पीएमआरडीच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय; सेना-राष्ट्रवादीलाही यश, काँग्रेस मात्र…
- ‘कंगनाच्या सौंदर्यासमोर काहींना स्वातंत्र्य आंदोलनातील शहीदांचा अपमान ही जाणवत नाही का?’
- ‘जेपी नड्डांनी कर्णपिशाच्चांच्या नादाला लागू नये, नाहीतर भाजप महाराष्ट्रातून नष्ट होईल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

