मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईतील आझाद मैदानात गेल्या चार दिवसांपासून एसटी कर्मचारी ठाण मांडून बसले आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत हे या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. तर परिवहन मंत्री अनिल परब वारंवार कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर काल(१२ नोव्हें.) सध्या सुरू असलेल्या एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपात तोडगा काढण्याच्या दृष्टीने या कर्मचाऱ्यांना लगेचच सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे.
राज ठाकरे यांनी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींसह शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या वेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आदी उपस्थित होते. संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. तेव्हा कर्मचाऱ्यांनी तोडग्यासाठी काही उपाय सूचविले होते.
दरम्यान, विविध सरकारी मंडळे किंवा उपक्रमांमधील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन यापूर्वीच लागू झाला आहे. याच धर्तीवर एस.टी. कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केल्यास त्यांच्या वेतनात वाढ होऊ शकेल, असे राज ठाकरे यांनी निदर्शनास आणून दिले. एस.टी. कर्मचाऱ्यांची सेवा सरकारी सेवेत विलीनीकरणाची मागणी असली तरी हा निर्णय घेण्यास कालावधी लागू शकतो. त्यापेक्षा सातवा वेतन आयोग लागू केल्यास कर्मचाऱ्यांना तात्काळ दिलासा मिळेल, अशी भूमिका मनेसेकडून मांडण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- अनिल देशमुखांना कोर्टाचा दिलासा नाहीच; ईडीची कोठडी 15 नोहेंबरपर्यंत कायम
- जय श्री राम म्हणणारे मुनी नाही, तर राक्षस; काँग्रेस नेते राशीद अल्वींचं वादग्रस्त वक्तव्य
- पीएमआरडीच्या निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय; सेना-राष्ट्रवादीलाही यश, काँग्रेस मात्र…
- ‘कंगनाच्या सौंदर्यासमोर काहींना स्वातंत्र्य आंदोलनातील शहीदांचा अपमान ही जाणवत नाही का?’
- ‘जेपी नड्डांनी कर्णपिशाच्चांच्या नादाला लागू नये, नाहीतर भाजप महाराष्ट्रातून नष्ट होईल’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

