मुंबई : नाशिक येथे होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी 50 लाख रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
26 मार्चपासून हे संमेलन नाशिक येथे गोखले शिक्षण संस्थेच्या प्रांगणात होत असून ज्येष्ठ विज्ञान लेखक जयंत नारळीकर यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.
दरम्यान,९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी डॉ.जयंत नारळीकर आता असल्यामुळे निश्तिच विज्ञान आणि साहित्य यांचा अनोखा संगम या निमित्ताने रसिकांना पाहायला मिळेल यात शंका नाही.
हे संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे आयोजित करण्यात येत असून लोकहितवादी मंडळ, नाशिक यांनी या संमेलनाच्या आयोजनासाठी निमंत्रण दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ‘ती’ आक्षेपार्ह पोस्ट शेअर करायला नको होती’
- शेतकरी आंदोलनात फूट पडल्यामुळे या लढ्याला काही अर्थ उरला नाही : नरेश टिकैत
- ऑस्ट्रेलियामधील वर्णभेद घटनेनंतर इंग्लंडने उचलले ‘हे’ मोठे पाऊल
- सलग चौथ्या वर्षी मालमत्ता करवाढ न करण्याचा आयुक्ताचा निर्णय
- कोकणामध्ये भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष करणार; निलेश राणेंची सिंहगर्जना


