Share

“भारताला भारतात नमविणे कठीणच”

Published On: 

नवी दिल्ली : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होण्यास अवघ्या एका आठवड्याचा कालावधी उरला आहे.  कोरोनानंतर पहिल्यांदाच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात येणार आहे. इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हे दोन्ही सामन्यांचे आयोजन चेन्नईमध्ये करण्यात आले आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यात ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ वनडे सामने खेळणार आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आला आहे. या दोन्ही संघांदरम्यान चेन्नई येथे ५ फेब्रुवारीपासून चार सामन्यांची रंगतदार कसोटी मालिका सुरू होत आहे.

भारताला त्यांच्या मैदानावर पराभूत करणे किती कठीण असते हे इंग्लंडला चांगले ठाऊक आहे. इंग्लंडचे माजी प्रशिक्षक व झिम्बाब्वेचे माजी खेळाडू ॲण्डी फ्लॉवर यांनी ही बाब मान्य केली. टीम इंडियाला हरविणे इंग्लंडला कठीण जाणार असल्याचे त्यांचे मत आहे.

फ्लॉवर यांनी ॲलिस्टर कूक याचे २०१२च्या भारत दौऱ्याचे उदाहरण देत ज्यो रुट यानेही कूकचे अनुकरण करण्याचा सल्ला दिला. कूक मैदानावर भक्कमपणे उभा राहायचा. त्यावेळी भारत मायदेशात पराभूत झाला होता. रुटनेही असेच पाय रोवायला हवेत. आगामी कसोटी मालिका पाहुण्या संघासाठी फार कठीण असल्याचे भाकीत फ्लॉवर यांनी वर्तविले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!