Share

महाविकास आघाडीचे तीन मतं रद्द होणार? भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणूक रिंगणात आपले नशीब आजमावले आहे. गेल्या 22 वर्षात पहिल्यांदाच महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकीत मतदान झाले आहे. यापूर्वी राज्यातील राज्यसभेच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. अशा स्थितीत शिवसेना आणि भाजप यांच्यात काटे की टक्कर पाहायला मिळाली. दरम्यान, भाजपने महाविकास आघाडी च्या तीन मतांवर आक्षेप घेतला आहे.

काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर, शिवसेना आमदार सुहास कांदे आणि राष्ट्रवादी काँग्रसचे आमदार आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप भाजपने केला आहे. भाजपा नेते पराग अळवणी आणि आशिष शेलार यांनी हा आरोप केला आहे. भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहित महाविकास आघाडीचे मते रद्द करण्याची मागणी केली आहे.

काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी मतदान झाल्यानंतर मतपत्रिका नाना पटोले यांच्याकडे दिली. तर जितेंद्र आव्हाड यांनी देखील मतपत्रिका जयंत पाटलांकडे दिली. शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी देखील असाच प्रकार केला. त्यामुळे यांचे मतदान रद्द करा, अशी मागणी भाजपने केली आहे. याबाब भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेतली आहे.

राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी भाजपचे तीन उमेदवार पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक. दुसरीकडे शिवसेनेकडे संजय राऊत आणि संजय पवार हे दोन उमेदवार आहेत. तर राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे इम्रान प्रतापगढ़ी रिंगणात आहेत.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!