🕒 1 min read
Supriya Sule | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. दोन दिवसांपूर्वी सिनेमागृहात हर हर महादेव या चित्रपटाच्या शोदरम्यान मारहाण केल्याप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी त्याला अटक केली होती. आता त्यांच्यावर एका महिलेचा विनयभंग प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने मुंब्रा पोलीस (Mumbra Police) ठाण्यात आयपीसी कलम ३५४ अन्वये एफआयआर दाखल केला होता. या आरोपानंतर जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले होते. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी आव्हाडांना राजीनामा न देण्याचे आवाहन केले आहे.
सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या मतदारसंघात चांगल काम केलं आहे. त्यामुळे लोकांसाठी त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेऊ नये. आमची आव्हाडांना विनंती आहे की त्यांनी लढलं पाहिजे. ही लढाई खोट्या केसेस विरुद्ध आहे. राजकारणाची पातळी इतकी खालावली आहे का? तिथे मुख्यमंत्री आहेत, खासदार श्रिकांत शिंदे आहेत, पोलीस यंत्रणा आहे. अशावेळी आरोप होतात, हे वेदनादायी आहे. असे आरोप होतात तेव्हा फक्त समाज नाही तर महिलांचेही यात नुकसान होत.”
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान (Fauzia Khan) यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारमधील सर्व मित्र पक्ष व समविचारी पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतली. महाराष्ट्रात सत्ताधारी पक्षाकडून लोक महिलांबद्दल होणारे एका मागून एक अपमानास्पद भाष्य करू लागेल आहेत. या गोष्टीची वेदना सर्व महिला लोकप्रतिनिधींमध्ये होत आहे. या विषयी राज्यपाल महोदयांनी सत्ताधाऱ्यांना समज द्यावी तसेच संविधानिक शपथ घेताना काही कायदे आणून महिलांचा सन्मान करण्यात यावा अशी भूमिका घ्यावी, ही मागणीही करण्यात आली असे फौजिया खान (Fauzia Khan) यांनी माध्यमांना सांगितले.
यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यांवर बोलताना फौजिया खान म्हणाल्या की, जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या कृतीत कोणतीही विनयभंगाची गोष्ट नव्हती हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. लोकप्रतिनिधी यातून राजीनामा देण्याची भूमिका घेतो ही राज्याची शोकांतिका आहे.
विद्या चव्हाण म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांना बदनाम करण्यासाठी राज्य सरकारकडून, गृहखात्याकडून अथवा पोलिसांकडून कायद्याचा गैरवापर केला जात असेल तर या विरोधात आम्ही कोर्टात जाऊ. एखाद्या महिलेला गर्दीतून बाजूला करणे हा गुन्हा असेल तर मुंबई शहरात प्रत्येक दिसवसाला लाखोंमध्ये गुन्हे दाखल होतील. त्यामुळे गृह खात्याचा असा गैरवापर होत असेल तर मुख्यमंत्र्यांनी तातडीने हे खात त्यांच्याकडे घ्यावे.
महत्वाच्या बातम्या :
- Jaya Bachchan | महिलांचा अपमान आम्ही सहन करणार नाही – जया बच्चन
- Winter Care Tips | हिवाळ्यामध्ये दररोज आंघोळ करत नसाल, तर त्याचेही आहेत अनेक फायदे
- Amol Mitkari | “आव्हाडांना राजकीय जीवनातून संपविण्याचे कटकारस्थान” ; अमोल मिटकरी यांचे सूचक ट्विट
- Jitendra Awhad | आरोपांबाबत बोलताना जितेंद्र आव्हाड झाले भावूक; म्हणाले, “माझ्या खुनाचं षडयंत्र रचलं असतं तरी…”
- Eknath Shinde | ५० नाही हजार खोके विकासासाठी दिले – एकनाथ शिंदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
