Share

Jitendra Awhad | अटकेत असलेल्या जितेंद्र आव्हाडांना हायपर टेन्शनचा त्रास, रुग्णालयात दाखल

Published On: 

Jitendra Awhad | मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना पोलिसांनी अटक केली आहे. हर हर महादेव चित्रपट प्रदर्शनात अडथळा आणल्याप्रकरणी आणि मल्टिप्लेक्समध्ये प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या जितेंद्र आव्हाड यांना काल संध्याकाळी ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.

रुग्णालयात आव्हाडांचं मेडिकल चेकअप करण्यात आलं. त्यांना हायपर टेन्शनचा त्रास झाल्याचं चेकअपमध्ये समोर आलं आहे. डॉक्टरांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर उपचार करून त्यांना पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे.

आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी ठाणे शहरातील एका मल्टिप्लेक्समध्ये घुसून ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा आणल्याची घटना घडली होती. चित्रपटात शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी छेडछाड केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. या संदर्भात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, प्रेक्षकांनी पैसे परत मागितल्यावर आव्हाड आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यापैकी काहींना मारहाण केली आणि चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा निर्माण केला. हा वाद नेमका काय आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये ‘हर हर महादेव’ चित्रपटावर टीका केली होती. “हर हर महादेव, या सिनेमात विकृतीचा एक वेगळाच कळस गाठला गेला. बाजीप्रभू देशपांडे चक्क महाराजांचे एकेरी नाव घेत त्यांच्याशी युद्ध करत आहेत. एका स्वामीनिष्ठ मावळ्याचा हा केवढा अपमान आहे! या सिनेमात बाजीप्रभू ही व्यक्तिरेखा खुद्द महाराजांपेक्षाही मोठी दाखवली आहे. महाराजांना प्रत्येक गोष्ट जणू काही बाजीप्रभूच शिकवत होते आणि महाराजांना, जिजाऊंना किंवा इतर दरबारी लोकांना काहीच माहीत नव्हते इतक्या दर्जाचा हा विपर्यास आहे. अफजलखानाचे पोट फाडताना महाराज खानाला मांडीवर घेतात, का तर महाराज हे नृसिंहअवतार वगैरे आहेत असे सुचवायचे आहे,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!