Share

सरकार ताठीवर जायला आता तीन चार महिने पुरे आहेत, खा. नाईक निंबाळकरांचा सूचक इशारा

Published On: 

मुंबई – महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल नसल्याचं आता समोर आलं आहे. तश्या तक्रारी काँग्रेसच्या जेष्ठ मंडळींनी थेट प्रसारमाध्यमांपाशी बोलून दाखवल्या आहेत. त्यावरच आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेसला चिमटे घेतले आहेत.

सरकारमध्ये काँग्रेसला बाजूला ठेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दोघेच सर्व निर्णय घेत असल्याची काँग्रेसची तक्रार आहे. तसेच काँग्रेस नेते महाविकास आघाडी सरकारवर उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. यावर शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून जुनी खाट अधूनमधून जास्त कुरकुरतेय? असा सवाल करत काँग्रेसवर निशाणा साधलाय. त्यावर आता काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेवर पलटवार केल्याने आज चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, आता या वादात भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उडी घेतली आहे. सरकार कोविड 19 बाबत उपाययोजना करण्यासाठी अपयशी ठरलं आहे. सरकार आता खाटेवर आल्याच जर सामना दैनिकास वाटत असेल तर ते ताठीवर जायला आता तीन चार महिने पुरे आहेत, अशी जळजळीत टीका भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.

‘महाविकास आघाडी सरकारमध्ये धुसफूस वाढली आहे. त्यामुळे सरकार हे आता खाटेवर आलं आहे. बहुतेक सरकार चालवण्याचा लोड तिन्ही पक्षांना झेपत नाही, असं आता दिसून येत आहे. त्यामुळे तिन्ही पक्षात प्रचंड कुरबुरी वाढल्या आहे. त्यामुळे या कुरबुरीतून डाव मोडायचा असं चित्र आज सामनाच्या लेखातून दिसून आलं आहे’, अशी टीका निंबाळकर यांनी केली. न्यूज 18 लोकमतने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

#corona : बोनी कपूर यांच्या नोकराला कोरोनाची लागण; संपूर्ण कुटुंब क्वारंटाइन

सोपल, मिरगणे, आंधळकर यांच्या मैत्रीपर्वातूनच वैराग भागाचे प्रश्न सुटतील : निंबाळकर

जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबाचा कोरोनानं मृत्यू, भक्तांनी वाढवली अख्या शहराची चिंता

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!