बार्शी : चाळीस वर्षाचा राजकीय अनुभव असणारे जेष्ठ नेते दिलीप सोपल तसेच भाजपा सरकारमध्ये कॅबिनेटमंत्री पदाचा दर्जा लाभलेले राजेंद्र मिरगणे व सामाजिक बांधिलकी जपणारे शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांची महायुतीच्या माध्यमातून मजबुत एकी झाली आहे. या तिघांच्या मैत्रीपर्वाच्या माध्यमातूनच वैराग भागाचे प्रश्न सुटतील, असा विश्वास जिल्हा परिषदेचे माजी सभापती मकरंद निंबाळकर यांनी व्यक्त केला. शिवसेना-भाजपा महायुतीची उमेदवार दिलीप सोपल यांच्या प्रचार सभेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी निंबाळकर म्हणाले सोपल घराणेहे वैरागचे ग्रामदैवत संतनाथ महाराज देवस्थानचे मानकरी आहेत. त्यांनी कायम वैराग भागाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांच्या कुटील कारस्थानामुळे संतनाथ सहकारी साखर कारखाना बंद पडला. कामगारांना चिथावनी देवून कारखाना कोणी बंद पांडला हे तालुक्याला माहित आहे. आगामी काळात वैराग तालुका निर्मितीचा प्रश्न सोपलांच्याच माध्यमातून मार्गी लागणार आहे. महायुतीच्या सरकार दरबारी पाठपुरावा करताना सोपल यांना या प्रश्नात मिरगणे यांचे भरीव सहकार्य लाभणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार असून मिरगणे हे मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकार्य आहेत. त्यामुळे वैरागला सिना-भोगावती जोडकालव्याचे पाणी मिळावे तसेच वैरागला ग्रामीण रूग्णालय व्हावे, वैराग गामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये आदी कामे भविष्यात सोपल मार्गी लावतील.
माजी आमदार चंद्रकांतनाना निंबाळकर यांच्या बद्दल सोपल यांच्या मनात कायम आदर भावना आहे. मी सोपल यांचा 2008 पासून सहकारी आहे. त्यांनी मला कायम राजकारणात पाठबळ दिले. दुधसंघ संचालक व जिल्हा परिषदेचे सभापती पद बहाल केले. मात्र राऊत यांनी वैराग भागातील किती सहकार्यांना न्याय दिला हे सांगावे, असा प्रश्न यावेळी मकरंद निंबाळकर यांनी केला आहे.
निरंजन भूमकर यांच्यावर टिक़ा करताना निंबाळकर म्हणाले, वैराग ग्रामपंचायतीमध्ये गेल्या पाच वर्षात लोकहिताचा कारभार झाला नाही. भुमकरांना वैराग भागात जनाधार नाही, सोपलांच्या पाठबळामुळेच भुमकरांच्या आई जिल्हा परिषद सदस्य झाल्या. भुमकर हे अपक्ष उमेदवाराची बी टिम आहे. विरोधकांने लक्ष्मीदर्शन घडविल्यामुळेच भुमकर राष्ट्रवादीमध्ये राहिले. मात्र या निवडणूकीत आपली राजकीयपत त्यांच्या लक्षात येईल, असा टोलाही निंबाळकर यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1185169854770212869?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1185161508780568582?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1185161418498138112?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

