औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी राज्यभरातील मराठा तरुणांनी बलिदान दिले होते. बलिदान दिलेल्या कुटुंबातील सदस्यांना आधार देण्याचा असेल घेण्यासाठी एसटीने घरातील एका सदस्यच नोकरी देण्याची घोषणा केली होती या घोषणेची अंमलबजावणी करत एसटी महामंडळाने जिल्ह्यातील तीन जणांना २७ मे रोजी नियुक्ती दिली ; मात्र अजूनही दोन जण वेटिंग वर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना कधी नोकरी मिळेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाची मोर्चेबांधणी औरंगाबादेतून झाली. या आंदोलनाची व्याप्ती राज्यभर झाली मूक मोर्चा ठोक मोर्चा रास्ता रोको आंदोलनानंतर ही शासनाकडून सकारात्मक निर्णय येत नसल्याने तरुणांमध्ये नैराश्य पसरले होते. या नैराश्यातून स्थानिक तरुणांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले. औरंगाबाद जिल्ह्याचे अगर कायगाव येथील काकासाहेब शिंदे या तरुणाने आरक्षणासाठी पहिले पाऊल उचलत कायगाव टोका येथील गोदावरी नदीच्या पात्रात उडी घेऊन बलिदान दिले. त्यानंतर बलिदानाची मालिका सुरू झाली. आरक्षणासाठी जिल्ह्यातील सात जणांनी बलिदान दिले.
बलिदान दिलेल्या कुटुंबातील एका सदस्याला एसटी महामंडळाने नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी तयारी केली आणि जिल्ह्यातील तिघांना २७ मे २०१९ रोजी १८ दिवसांपूर्वी विविध पदांवर नियुक्ती झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. मात्र यात दोन जण प्रतिक्षेत आहेत. रवी केशव चौधरी, सुनील कारभारी शेळके, भगवान सोनवणे या तिघांना एसटी महामंडळाचा औरंगाबाद विभागात नोकरी मिळाली आहे. तर उमेश एंडाईत, किशोर हरदे हे दोघे नोकरीच्या प्रतिक्षेत आहे. लवकरात लवकर नोकरी देण्याची मागणी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबीयांतर्फे केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘त्या’ व्हायरल व्हिडिओमुळे राष्ट्रवादी आणि भाजप आमनेसामने
- ‘मुख्यमंत्र्यांना दिलीप कुमारांच्या घरी जाता येते पण लोणकर कुटुंबीयांच्या नाही ; हे तर निबर कातडीचे सरकार’
- ‘गो कोरोना गो’ नाऱ्यानंतरही कोरोना झाल्याचं म्हणत आता रामदास आठवलेंनी दिला नवा नारा
- मराठवाड्यातील विद्यार्थी प्रचंड मेहनती योग्य दिशा मिळाल्यास ते उत्तम कामगिरी करतील- कुलगुरू डॉ. प्रमोद येवले
- ‘सुशीलकुमार शिंदे सोलापूरचे राजकीय बाप!’, भाजपच्या सुभाष देशमुखांकडून स्तुतीसुमने
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

