Share

नांदेड विभागातून तीनशेवी किसान रेल्वे सुसाट; महसूलात कोटींनी वाढ!

Published On: 

औरंगाबाद : नांदेड रेल्वे विभागाच्या नगरसूल येथून तीनशेवी किसान रेल्वे २४६ टन कांदा घेवून पश्चिम बंगाल येथील मालडा टाऊन येथे सोमवारी (दि.९) रवाना झाली. वाहतूक दरात ५० टक्के सुट दिली जात असल्याने शेतीमालाचा रेल्वे वाहतुकीत वाढ झाली आहे. त्याचा आणखीन लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

नांदेड रेल्वे विभागातून ५ जानेवारी रोजी सुरु केलेल्या किसान रेल्वेने मोठा पल्ला गाठला आहे. २१६ दिवसात ३०० किसान रेल्वेने नगरसूल येथून देशाच्या विविध भागात कांदा, द्राक्षे आणि टरबूज पोहोचविले आहे. या किसान रेल्वे तून नांदेड रेल्वे विभागास ४२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.  किसान रेल्वेने वाहतूक केल्यामुळे वाहतूक दरात ५० % सूट देण्यात येत आहे. अनेक शेतकरी किंवा व्यापारी योजनेचा याचा लाभ घेत आहेत. फक्त २१६ दिवसात ३०० किसान रेल्वे चालविल्या जात आहेत. या ३०० किसान रेल्वे मधून आजपर्यंत ९१६६५ टन  कांदा, टरबूज आणि द्राक्षांची वाहतूक झाली आहे.

हा शेतीमाल देशातील विविध भागात जसे नवी दिल्ली, गुवाहाटी, मालडा टाऊन, अगरतला, फातुहा, न्यू जलपैगुडी इत्यादी ठिकाणी पोहोचविण्यात आला आहे. यामुळे कांदा, टरबूज आणि द्राक्षे उत्पन्न करणारे शेतकरी किसान रेल्वे चा लाभ घेत येत आहेत. कृषी क्षेत्राच्या मार्केटींग करिता अडचणी मुक्त, सुरक्षित व जलद वाहतूक सेवा उपलब्ध करून देताना कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढविण्यासाठी किसान रेल चालवण्याची संकल्पना भारत सरकारने सुरू केली आहे.

साधारण ५० किलोमीटर प्रती घंटा या वेगाने धावतात. यामुळे शेती माल वेळेवर पोहोचतो. शेतकऱ्यांना चांगली बाजार पेठ उपलब्ध होते. नांदेड रेल्वे विभागातील इतर ठिकाणाहून सुद्धा किसान रेल्वे सुरु करण्याकरिता बिजिनेस डेवलपमेंट यूनिट (बी.डी.यु. टीम) मधील अधिकारी सतत प्रयत्नरत आहेत. मालवाहतूक भाड्यात ५० % सूट चा इतर ठिकाणातील शेतकरी मित्र, व्यापाऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन नांदेड रेल्वे विभागीय व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!