मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्रस्थान असलेल्या मंत्रालयात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मंत्रालयातील उपहारगृह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्यांचा खच आढळून आला आहे. मंत्रालयात राजपात्रित अधिकाऱ्यांच्या उपहारगृहाच्या खालील बाजूस हे एक रुम आहे. तिथे हे धक्कादायक चित्र आढळून आले.
या दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्या कशा? हा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्याचं कारणही महत्वाचं आहे. संपूर्ण राज्याचा कारभार या मंत्रालयातून पाहिला जातो. जर सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश करायचा असेल तर येथील सुरक्षा यंत्रणांचा सामना करावा लागतो. त्यांची चौकशी केली जाते. पण मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून या दारुच्या बाटल्या आत आल्याच कशा? असा प्रश्न सध्या सर्वच स्तरांतून व्यक्त केला जात आहे.
या सर्व प्रकरणावरून आता भाजपने ठाकरे सरकारला खडे बोल सुनावले आहेत. ‘ज्या मंत्रालयातून राज्याच्या विकासाची व सामान्य लोकांची कामे झाली पाहिजेत तेथे बसून मंत्री, त्यांचे कार्यकर्ते आणि अधिकारी दारूच्या पार्ट्या करतात, आघाडी सरकारने मंत्रालयाचे रूपांतर एखाद्या बार मध्ये केले आहे.
सामान्य माणसाला मंत्रालयात कितीही महत्त्वाचे काम असले तरी दिवसभर लाईन मध्ये उभे राहून पास घ्यावा लागतो, त्याची पूर्ण तपासणी होते, त्यामुळे या दारूच्या बाटल्या फक्त मंत्री, त्यांचे कार्यकर्ते किंवा अधिकारी जे तपासणी शियाय मंत्रालयात जातात तेच घेऊन जाऊ शकतात, मंत्रायलायचे मदिरालय कोणी केले याची सखोल चौकशी झाली पाहिजे.’ अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव प्रदीप गावडे यांनी केली आहे.
ज्या मंत्रालयातून सामान्य लोकांची कामे झाली पाहिजेत तेथे बसून मंत्री, त्यांचे कार्यकर्ते आणि अधिकारी दारूच्या पार्ट्या करतात, आघाडी सरकारने मंत्रालयाचे रूपांतर एखाद्या बार मध्ये केले आहे.
— Adv. Pradip Gavade (@PradipGavade) August 10, 2021
दरम्यान आता विरोधकांनी या प्रकरणावरून राण उठवल्यानंतर या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल, तसेच हे कृत्य करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आरटीई रकमेबाबत शिक्षक संघटना आक्रमक; दिल्लीतील जंतरमंतरवर केले आंदोलन!
- ‘स्वबळा’च्या घोषणेनंतर आणि प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे घेतल्यानंतर नाना पटोले प्रथमच औरंगाबादेत!
- संत-महंतांच्या भूमीत या सरकारने संस्कृती आणि परंपरेचा सत्यानाश केलाय – चंद्रकांत पाटील
- ‘लोकउपयोगी कामे केली म्हणून गुन्हा माफ होत नाही’ ; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला
- प्रवाशांना दिलासा! नांदेड-श्रीगंगानगर एक्स्प्रेस पुन्हा धावणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

