🕒 1 min read
औरंगाबाद : आरटीई प्रतिपूर्तीची चार वर्षाची थकित रक्कम तात्काळ शाळांना द्यावी. या मागणीसाठी मेसा, मेस्को इंग्रजी शाळा संघटनानी दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानावर सोमवारी (दि.९) धरणे आंदोलन करत राज्य सरकारच्या धोरणांचा तीव्र निषेध केला. यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांना भेटून निवेदन देण्यात आले.
मेसा आणि मेस्को इंग्रजी शाळा संघटनाच्या वतीने क्रांती दिनी विविध मागण्यांसाठी दिल्ली येथे जाऊन आंदोलन करून निवेदन देण्यात आले. यावेळी आरटीई कायद्याअंतर्गत वर्षातून दोन हप्त्यात प्रतिपूर्ती मिळावी. तसेच आरटीई प्रतिपूर्ती रक्कम केद्रांचा हिस्सा डायरेक्ट शाळेच्या बँक खात्यावर जमा करावा. आरटीई २५% अंतर्गत मोफत शिक्षण इयत्ता नर्सरी ते बारावीपर्यंत म्हणजेच वय वर्ष ३ ते १८ करावे. याशिवाय आरटीईचा प्रतिपूर्तीची रक्कम पीटीए ने मंजूर केलेल्या शाळेच्या फिसप्रमाणे मिळावी, आरटीईची रक्कम केंद्राने पाठवूनही वाटप न करणाऱ्या राज्य व संबधित अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी.
या मागण्या मांडून याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पोलिस उपायुक्त विनय माथूर यांच्या पुढाकाराने केंद्रिय शिक्षणमंत्री धरमेंद्र प्रधान व केंद्रीय राज्य अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड संबधित आधिकारी यांच्याबरोबर शिष्टमंडाळाने साविस्तर चर्चा केली. यावेळी पूढील महिन्यात शिक्षण आणि अर्थमंत्री, सचिव आणि संबधित आधिकारी व इंग्रजी शाळा संघटना पदाधिकारी समवेत संयुक स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असल्याचे शिक्षण व अर्थ मंत्र्यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले. यावेळी मेसाचे अध्यक्ष प्रल्हाद शिंदे, गजानन वाळके, आरटीई फाऊंडेशन नागपूरचे अध्यक्ष प्रा . सचिन काळबांडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
- दुसऱ्या बाळाच्या नावावरून करीना कपूर सोशल मीडियावर ट्रोल
- ‘स्वबळा’च्या घोषणेनंतर आणि प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे घेतल्यानंतर नाना पटोले प्रथमच औरंगाबादेत!
- संत-महंतांच्या भूमीत या सरकारने संस्कृती आणि परंपरेचा सत्यानाश केलाय – चंद्रकांत पाटील
- ‘लोकउपयोगी कामे केली म्हणून गुन्हा माफ होत नाही’ ; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला
- प्रवाशांना दिलासा! नांदेड-श्रीगंगानगर एक्स्प्रेस पुन्हा धावणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
