औरंगाबाद : भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा सर्वांसमोर आला आहे. त्यामुळे लोकांच्या मनात भाजप विरोधात प्रचंड रोष आहे. आगामी निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना डिपॉझिटही परत मिळणार नाही, अशी घणाघाती टीका माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी केली आहे. शिवसेनेच्या वतीने आयोजित आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
भाजप हा कपट, कारस्थान करणारा पक्ष असून भाजपच्या नेत्यांनी खोटे बोलण्याचा कळस गाठला आहे. भाजपने मराठा आणि ओबीसी समाजाला न्याय देण्याऐवजी राजकारण केले. या माध्यमातून पुन्हा एकदा भाजपचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे. त्यामुळे भाजप आणि त्यांच्या नेत्यांविरोधात लोकांमध्ये प्रचंड रोष असल्याचे खोतकर म्हणाले. त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना डिपॉझिटही परत मिळणार नाही. त्यासाठी शिवसैनिकांनी पेटून उठावे असे आवाहन खोतकर यांनी केले.
मागील लोकसभा निवडणुकीच्या काळातच खोतकर यांनी भाजप उमेदवाराच्या विरोधात दंड थोपाटले होते. मात्र, वरीष्ठांच्या आग्रहामुळे त्यांनी तलवार म्यान केली होती. आता शिवसेना- भाजप यांच्यात युती राहिलेली नाही. त्यामुळे त्यांनी भाजपच्या विरोधात जोरदार प्रचाराची सुरूवात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आरटीई रकमेबाबत शिक्षक संघटना आक्रमक; दिल्लीतील जंतरमंतरवर केले आंदोलन!
- ‘स्वबळा’च्या घोषणेनंतर आणि प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे घेतल्यानंतर नाना पटोले प्रथमच औरंगाबादेत!
- संत-महंतांच्या भूमीत या सरकारने संस्कृती आणि परंपरेचा सत्यानाश केलाय – चंद्रकांत पाटील
- ‘लोकउपयोगी कामे केली म्हणून गुन्हा माफ होत नाही’ ; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला
- प्रवाशांना दिलासा! नांदेड-श्रीगंगानगर एक्स्प्रेस पुन्हा धावणार

