औरंगाबाद : शिवसेनेचा विश्वास घात करणारा भाजप हाच आपला प्रमुख शत्रू आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीमध्ये भाजपला नेस्तनाबूत करण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे, असे आवाहन शिवसेना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिल्लोडमधील शिवसेना भवनमध्ये पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर कोरोना, चक्री वादळ, अतिवृष्टी अशी अनेक संकटे उभे राहिली. अतिशय संयमाने ही परिस्थिती हाताळून कुटुंब प्रमुखाप्रमाणे मुख्यमंत्री या संकटात मदतीला धावून आले. शिवसैनिकांनी कोरोना काळात गरजूंना जीवनावश्यक वस्तू घरपोच जावून दिले. शिवसेना हा सामाजिक बांधिलकी जपणारा पक्ष आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणामुळे सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर हवालदिल झालेला आहे. त्यामुळे भाजपला त्यांची जागा दाखविण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहून येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगर पालिका, नगर पंचायत आशा प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेचा निर्विवाद भगवा फडकविण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.
महत्त्चाच्या बातम्या
- ‘हे ठाकरे सरकार आहे की कोडगे सरकार? किती थपडा खाणार?’
- ‘स्वबळा’च्या घोषणेनंतर आणि प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्रे घेतल्यानंतर नाना पटोले प्रथमच औरंगाबादेत!
- संत-महंतांच्या भूमीत या सरकारने संस्कृती आणि परंपरेचा सत्यानाश केलाय – चंद्रकांत पाटील
- ‘लोकउपयोगी कामे केली म्हणून गुन्हा माफ होत नाही’ ; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला
- प्रवाशांना दिलासा! नांदेड-श्रीगंगानगर एक्स्प्रेस पुन्हा धावणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

