नवी दिल्ली : संसदेत १०२ व्या घटना दुरुस्तीचे विधेयक मांडण्यात आले. राज्य सरकारांना त्यांच्या राज्यातील मागास जातींना आरक्षण देण्याचा अधिकार पुन्हा मिळणार आहे. यामुळे मराठा आरक्षणाबाबत आता समाजाला नवी आशा निर्माण झाली असली तरी विरोधकांनी मात्र या घटना दुरुस्तीचा मराठा आरक्षणाला फायदा होणार नसल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, या विधेयकावर संसदेत चर्चा सुरु असताना विरोधकांसह सत्ताधारी खासदारांनी सहभाग घेतला होता. संसदेचं पावसाळी अधिवेशनाचा बराच मोठा कालावधी हा कामकाजाविना वाया गेल्यानंतर आज घटना दुरुस्तीवर चर्चा करण्यासाठी विरोधकांनी सभागृहात हजेरी लावली होती. विरोधी खासदारांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केल्यानंतर भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी विरोधकांवर जोरदार पलटवार केला आहे.
‘चांगले निर्णय ते आम्ही केले, हायकोर्टात चांगली बाजू मांडली तर आमचं श्रेय, सुप्रीम कोर्टात फेल गेले तर केंद्राचं अपयश. चांगलं ते आमचं आणि दोष मात्र केंद्राने डोक्यावर घ्यावा अशी जर तुमची दुजाभावाची भूमिका असेल तर जनता तुम्हाला तुमची जागा योग्यवेळी दाखवल्याशिवाय राहणार नाही,’ असा घणाघात प्रीतम मुंडे यांनी संसदेत बोलताना केला आहे.
यासोबतच, ’50 टक्क्यातच आरक्षणाची मागणी करणाऱ्यांना बसवायचं तर कोणत्या जातीला किती आरक्षण द्यावं हे सुद्धा केंद्राने आम्हाला सांगावं, असं कोणी तरी सदस्य म्हणाला. आता हे जर केंद्राने सांगितलं आणि येणाऱ्या काळात मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटला तर त्याचं शंभर टक्के श्रेय केंद्र सरकारचं आहे हे मान्य करायला तयार व्हाल का?,’ असा थेट सवाल देखील मुंडे यांनी विरोधकांना केलाय.
महत्त्वाच्या बातम्या
- …तर राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन करणार; राज्याच्या मुख्य सचिवांच विधान
- व्यवसायिक आस्थापनांना लागणार पूर्ण शुल्क, गुंठेवारी कक्षातील अधिकाऱ्यांची माहिती
- ‘प्रताप सरनाईक यांच्या कामाशी स्पर्धा करा’ ; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सल्ला
- ‘मंत्री गुलाबराव आणि नवाब भाई सारखे येड्या सारखं का बडबड करत हे आता कळले’
- ‘आरक्षणावर महाराष्ट्रातून दिशाभूल केली जातेय’; सुप्रिया सुळे संसदेत कडाडल्या


