Share

‘मुलीच्या फोटोंशी छेडछाड करण्याची धमकी’; केआरकेने केली मिका विरोधात तक्रार

Published On: 

मुंबई : अभिनेता कमाल रशिद खान नेहमी त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. मात्र त्याच्या या वक्तव्यामुळे तो अनेकवेळा अडचणीत देखील सापडला आहे. मध्यंतरी रशिद खान याच्यावर ‘राधे’ चित्रपटाच्या रिव्ह्यू संदर्भात अभिनेता सलमान खानने मुंबई कोर्टात मानहानीचा दावा केला. यासंदर्भात अभिनेता कमाल रशिद खानला नोटीस पाठवण्यात आली. त्या नंतर सर्वत्र या प्रकरणाची चर्चा सुरु झाली. आता केआरके आणि मिका सिंगमध्ये सुरु असलेल्या वादामुळे ते सोशल मीडियावर चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वी मिकाने केआरकेवर एक गाणं बनवलं होतं. त्या गाण्यावरून केआरकेने मिका सिंग विरोधात मुंबई पोलिस आणि मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. या गाण्यात मिकाने त्याच्या फोटोंशी छेडछाड केल्याचे केआरकेने म्हटले आहे. याविषयी केआरकेने ट्वीट करत मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे.

केआरकेने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘आदरणीय मुंबई पोलिस आणि मुंबई पोलिस आयुक्त, कृपया या कडे लक्ष द्या मिका सिंगने माझ्या फोटोंशी छेडछाड केली आहे आणि त्याचे गाणे प्रदर्शित केले आहे. आता तो माझ्या १४ वर्षाच्या मुलीच्या फोटोंशी छेडछाड करत गाणं प्रदर्शित करण्याची धमकी देत आहे. माझ्याकडे त्याचे सर्व मेसेजेस आणि रेकॉर्ड आहेत. कृपया माझी एफआयआर नोंदवून घ्या’, असे ट्वीट केआरकेने केले आहे.

मिकाच्या एका फॅन क्लबने ‘केआरके कुत्ता है’ या गाण्याचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत “मित्रांनो हे गाणं कसं वाटलं,” अशा आशयाचं ट्वीट केलं होते. हा टिझर शेअर करत हे गाणं ११ जूनला प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले. मिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!