Share

कोरोना नियमांवरून राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातच मंत्री शिंगणेंकडून कार्यकर्त्यांना कानपिचक्या

Published On: 

अकोला : पक्षाचे कार्यक्रम घेताना कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. तसेच सर्व नियोजन करूनच कार्यक्रम घ्यावा, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले. मूर्तिजापूर येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कोरोना योद्धांच्या सत्कार कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

या सभागृहात अनेकांनी आपल्या तोंडावर मास्क घातलेला नाही. असा कार्यक्रम माझ्या जिल्ह्यात असता तर प्रत्येकी हजार रुपये दंड वसूल करून घेतला असता. या कार्यक्रमात बरेच नियम पाळल्या गेले नसल्याची खंत त्यांनी या वेळी व्यक्त केली. कोरोना लाट ओसरली असली तरी अजून कोरोना संपलेला नाही व तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी नागरिकांनी सतर्कता बाळगून नियमाचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. नियम पाळले तरच खऱ्या अर्थाने कोरोनाचा मुकाबला करता येणे शक्य असल्याचे शिंगणे म्हणाले.

या रोगाची दाहकता वाढल्याने संपूर्ण देश बंद करावा लागला. भविष्यात नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. कोरोना काळात आशा वर्कर पुढे आल्या. त्यांचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आवर्जून कौतुक केले. या वेळी डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी, पोलिस, आशा वर्कर व येथील वंदेमातरम आपत्कालीन पथकाच्या सदस्यांचा कोरोना योद्धा म्हणून डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. माजी आमदार तुकाराम बिडकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, भैयासाहेब तिडके, आतिश महाजन, डॉ. आशा मिरगे इत्यादी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!