कोल्हापूर : मराठा आरक्षणासाठी आज कोल्हापुरात मूक आंदोलन पार पडले. राज्यभरातील मराठा समन्वयक आंदोलनात सहभागी झाले होते. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरही आंदोलनाला हजर होते. तसंच कोल्हापुरातील आमदार, खासदारांनीही मूक मोर्चाला उपस्थिती लावली आहे. आंदोलनस्थळी लोकप्रतिनिधींनी मराठा आरक्षणांच्या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट केली.
मात्र, आजच्या मूक मोर्चातील सत्ताधाऱ्यांच्या भाषणाबाबत मराठा क्रांती मोर्चा नाराज असल्याची माहिती मिळत आहे. मागण्या मान्य केल्याबाबतचं पत्र मिळण्याऐवजी केवळ भाषणबाजी ऐकायला मिळाली, असं मराठा क्रांती मोर्चाचं म्हणणं आहे. तसंच पुणे ते मुंबई लॉंग मार्च काढण्यावर मराठा क्रांती मोर्चा ठाम असल्याची देखील माहिती समोर येत आहे.
या मूक आंदोलनादरम्यान कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेना खासदार धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र मराठा समाज सत्ताधाऱ्यांच्या भाषणबाजीवर नारज झाला आहे.
दुसरीकडे, खासदार संभाजीराजे छत्रपती परवा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी जाणार आहेत. कोल्हापुरातील मूक आंदोलनाची सांगता झाल्यानंतर पुढील दिशा ठरवण्यासाठी समन्वयकांची बैठक झाली. या बैठकीत संभाजीराजेंनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीची माहिती दिली.
महत्वाच्या बातम्या
- याहीवर्षी राज्यभरात भरणार मोबाईलमध्येच शाळा
- ‘आरक्षणाला कोणीच विरोध करत नसताना हा पेच सुटत का नाही?’, धैर्यशील मानेंचा सवाल
- कसोटीचे महाभारत! सामना चौदावा, कर्णधार रुटच्या द्विशतकामुळे इंग्लंडची भारतावर २२७ धावांनी मात
- सरकारच्या अडचणी वाढणार : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा, ओबीसी आणि धनगर समाजही आक्रमक
- ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेवर लवकरच येणार चित्रपट?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
