Share

कधी होणार महाराष्ट्रात CET परीक्षा ? उदय सामंतांनी दिली महत्त्वाची माहिती

Published On: 

मुंबई : महाराष्ट्रात CET परीक्षा कधी होणार याबाबत महाराष्ट्र राज्याचे तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे. इयत्ता बारावी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी महत्त्वाची असणारी सीईटी CET परीक्षेच्या बाबतीत मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा आयोजित केली जाऊ शकते अशी माहिती महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

संपूर्ण राज्यातील विद्यार्थी आणि पालकांना सीईटी परीक्षेसंदर्भात प्रश्न पडला होता. त्या प्रश्नाचं उत्तर मंत्री सामंत यांनी दिल. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या महाविद्यालयांमध्ये वर्ग घेण्यात येणार नाहीत, ऑनलाईन क्लास सुरु राहतील. तसंच सीईटी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सीईटी परीक्षा होऊ शकेल, असं उदय सामंत म्हणाले आहेत.

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र कॉमन एन्ट्रान्स टेस्ट परीक्षेच्या पॅटर्नसह अधिकृत परीक्षा पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य कॉमन एन्ट्रान्स टेस्ट सेलने पीसीएम व पीसीबी या दोन्ही गटांसाठी एमएचटी सीईटी 2021 चा परीक्षेचा पॅटर्न जाहीर केला आहे. राज्य कॉमन एन्ट्रान्स टेस्ट सेल, महाराष्ट्र सीईटी 2021 परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. शैक्षणिक वर्षाच्या 2021-22 वर्षाच्या पहिल्या वर्षामध्ये प्रवेश घेण्याची तयारी करणारे विद्यार्थी 07 जुलै पर्यंत अर्ज करू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!