Share

याहीवर्षी राज्यभरात भरणार मोबाईलमध्येच शाळा

Published On: 

औरंगाबाद: कोव्हिडच्या महामारीमुळे सर्वच क्षेत्रांवर परिणाम होत आहे त्यातून शाळा देखील सुटल्या नाहीत. शाळेचा पहिला दिवस म्हणजे विद्यार्थ्यांचा किलबिलाट तर मोठ्या वर्गातल्या विद्यार्थ्यांची मस्ती, असा एकंदरीत शाळेचा पहिला दिवस असतो मात्र कोरोनामुळे याही वर्षी मुलांच्या शाळा मोबाईलमध्येच भरणार आहे. राज्यभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने चांगलाच कहर केला आहे त्यामुळे यंदा मोबाईल मध्येच ऑनलाईन पद्धतीनेच शाळा भरणार आहे. मात्र शाळेत शिक्षकांची पन्नास टक्के उपस्थिती अनिवार्य असून, विद्यार्थ्यांसाठी जरी शाळा बंद राहणार असली तरीही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सहजपणे पुढच्या वर्गात प्रवेश मिळालेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पुन्हा दुसऱ्या लाटेतही पुढच्या वर्गात प्रवेशाची संधी मिळाली. आता मंगळवारपासून (ता. १५) शैक्षणिक वर्ष सुरू झाले. दरम्यान, शाळेत शिक्षकांची पन्नास टक्के उपस्थिती अनिवार्य असून, विद्यार्थ्यांसाठी जरी शाळा बंद राहणार असली तरीही प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शिक्षकांना प्रवेशासाठी आणि सर्वेसाठी विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत जावे लागत आहे. शिक्षकांनी पहिल्या दिवशी घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चत करून त्यांचे स्वागत केले. मधल्या काही महिन्यांचा अपवाद वगळता दीड वर्षापासून ऑनलाइन वर्ग भरत आहे.

असे असले तरी अनेकांना ऑनलाइन शिक्षणात अडथळा येत आहे. काही मुले अभ्यासाच्या नावावर मोबाइलमध्ये गेम खेळत आहेत. ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाईल आणि विद्यार्थ्यांचे नाते घट्ट झाले आहे. याही वर्षी असेच चित्र राहणार आहे. दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी होणारा विद्यार्थ्यांच्या किलबिलाट दुसऱ्या वर्षीही ऐकायला मिळाला नाही. पहिलीच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत जात आहेत. जिल्हा परिषद असो की खाजगी शाळा येथील शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या सर्वेसाठी फेरी सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!