मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांनी अनेक सुपरहिट चित्रपटामध्ये काम केले आहे. त्यांच्या अनोख्या अंदाजामुळे ते नेहमीच चर्चेत आली आहे. बॉलिवडचा डिस्को डान्सर म्हणून त्यांना ओळखले जाते. आज त्यांनी वयाच्या ७१ वर्षात पदार्पण केले आहे.
उत्तम अभिनयासोबत त्यांच्या डान्सिंग स्टाइलचे अनेक चाहते होते. अनेक चाहते त्यांना प्रेमाने मिथुनदा म्हणतात. मिथुन चक्रवर्ती यांना लहानपणापासूनच डान्सची आवड होती. त्यामुळे सुरुवातीच्या काळात ते अनेक डान्स शो करत होते. कालांतराने मिथुन चक्रवर्ती यांनी राजकाराणात प्रवेश केला. मात्र इथे देखील पक्ष बदलांमुळे मिथुन चक्रवर्ती चर्चेत राहिले आहेत.
https://www.instagram.com/p/CO9zN9sMrUY/?utm_source=ig_embed&ig_rid=e7661209-4809-4740-919b-fa7e7d9c7d87
कोलकत्ता इथं केमिस्ट्रीमध्ये पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते पुण्यात आले. पुण्यातील फिल्म इंस्टीट्यूटमध्ये त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले. १९७६ सालात मिथुन यांनी ‘मृगया’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमासाठी मिथुन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले होते.
https://www.instagram.com/p/CMXvCi2ssZA/?utm_source=ig_embed&ig_rid=8bb4799b-ecd8-4d5e-bceb-ef76d4d30bed
मिथुन चक्रवर्ती अभिनयासोबतच उत्तम डान्स आणि अॅक्शनमुळे मिथुन चक्रवर्ती यांना मोठी लोकप्रियता मिळाली. हिंदी सोबतच त्यांनी बंगाली, हिंदी, भोजपुरी,तेलुगू, कन्नड़ आणि पंजाबी सिनेमांमध्ये उत्तम काम केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ठाकरे सरकारचा निर्णय दारू विक्रेत्यांसाठी’, चंद्रपूर दारूबंदी उठवण्याचा ५०० गावांकडून निषेध
- ‘मला माहित आहे की तु माझ्यासोबत आहे…’; अंकिताची भावूक पोस्ट
- जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या आशा सेविकांना आश्वासनाखेरीज सरकारने काहीही दिले नाही
- वाटेल ती किंमत मोजू, पण मराठा समाजाचे सगळे प्रश्न सोडवू – हसन मुश्रीफ
- ‘अहंकार जोपासण्यासाठी सरकारी तिजोरीची लूट व जनतेचे हाल हेच वसुली सरकार’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

