Share

संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेला हजारोंची गर्दी; मग शिवजयंती उत्सवावरच निर्बंध का?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयती (Shivjayanti २०२२) निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत दोनशे जण आणि जन्मोत्सव सोहळ्यासाठी पाचशे जणांना परवानगी दिली आहे. मात्र दुसरीकडे राज्यातच राजकीय नेत्यांच्या भरसभा, पत्रकार परिषद होत आहेत. मंगळवारीच शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली. (Sanjay Raut Press Council) यात हजारोंच्या संख्येने शिवसैनिकांनी गर्दी केली. प्रचंड घोषणा आणि जल्लोषाने ही पत्रकार परिषद झाली. मग शिवजयंती उत्सवावरच निर्बंध का? असा सवाल आता शिवप्रेमींना तसेच सर्वसामान्य जनतेला पडत आहे.

औरंगाबादेत शिवछत्रपती स्मारक उत्सवावर निर्बंध-

औरंगाबाद येथील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण सोहळ्याची वेळ मध्यरात्रीची ठेवण्यात आली आहे. मात्र सुप्रिम कोर्टाच्या निर्देशानुसार रात्री १२ वाजेनंतर ढोलताशे व इतर ध्वनिक्षेपकांवर बंदी आहे. मग १२ वाजता राजेंचे आगमन शांततेत कसे पार पडणार? असा सवाल जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष विनोद पाटील यांनी केला आहे.

तसेच गेल्या अनेक दिवसांपासून ढोल-पथक, वाद्य पथक राजेंच्या आगमनाची जय्यत तयरी करत आहेत. मात्र मध्यरात्री ढोल वादनास बंदी असल्याने सर्वांच्याच आनंदावर पाणी फेरले आहे. त्यातच नवीन घटना म्हणजे शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवभक्तांनी लावलेले बॅनर काढण्यात आले. याविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली असताना तेव्हा अधिकाऱ्यांनी पळ काढल्याचे मनसेकडून सांगण्यात आले.

संजय राऊतांच्या सभेला भव्य बॅनरबाजी करण्यात आली. मग शिवजयंती उत्सवाचे बॅनर का काढण्यात आले. असा सवालही यावेळी निर्माण होत आहे. शिवजयंती उत्सवाबाबत ठाकरे सरकार उदासीनतेची भूमिका घेत असल्यचे आता म्हटले जात आहे.

राजकीय आंदोलनाला परवानगी मग मशाल रॅलीला का नाही?

गेल्या अनेक दिवसांपासून राज्यांत काही न काही कारणांनी राजकीय आंदोलन करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून राज्यात शिवसेनेकडून अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आली. तसेच आता पंतप्रधान मोदींचा निषेध म्हणून कॉंग्रेसने विविध ठिकाणी आंदोलन केली. या आंदोलनांवेळी कोरोना कुठे जातो? असा प्रश्नही यावेळी निर्माण होतो.

राजकीय नेत्यांच्या अपमानासाठी उभे राहणारे नेते राजेंच्या उत्सवासाठी पुढाकार घेतील का?

राजकीय नेत्यांचा अपमान झाला म्हणून राज्यभर कार्यकर्त्यांकडून निषेध केला जातो. आंदोलन केली जातात. मग शिव छत्रपतींच्या उत्सवासाठी हे राजकीय नेते पुढाकार का घेत नाहीत? असा सवालही यानिमिताने तयार होत आहे.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून प्रत्येक सण- उत्सवांवर निर्बंध राहिले आहेत. मात्र यंदा कोरोना संक्रमण कमी होताना दिसत असताना ठाकरे सरकराने निर्बंधांत शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार यंदा शिवजयंती उत्सवही धूमधडाक्यात पार पडणार असला तरी संख्येतील मर्यादेवरून शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!