मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांनी प्रयागराजमधील सभेला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी एक मोठी घोषणा केली. देशात लवकरच हवेत उडणाऱ्या बस पहायला मिळतील, असे ते म्हणाले. मात्र यावरूनच कॉंग्रेस नेते अतुल लोंढे पाटील (Congress leader Atul Londhe Patil) यांनी चांगलाच टोला लगावला आहे.
“हवा में सरकार चलाने वाले हवा में “बस” तो चल ही सकते है”, असा खोचक टोला लगावत अतुल लोंढे यांनी नितीन गडकरी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. दरम्यान या घोषणेनंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटताना दिसून येत आहे.
https://twitter.com/atullondhe/status/1494180850077818884
दरम्यान गडकरी म्हणाले की,‘मी उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांना हवेत चालणाऱ्या बसचाही डीपीआर तयार करत असल्याचे सांगितले आहे. प्रयागराजमध्ये रस्त्याच्या वर हवेत चालणारी बस चालवू. तसेच माझ्याकडे पैशांची कोणतीही कमतरता नाही. मी करोडोंमध्येच चर्चा करतो.’
तसेच उत्तर प्रदेशचे नशीब बदलण्यासाठी भाजपचे सरकार गरजेचे आहे. तसेच प्रयागराजमध्ये सी प्लेन सेवा सुरु करण्याचे माझे स्वप्न आहे, ज्यामुळे मी दिल्लीवरुन उड्डाण करुन संगमच्या पाण्यातून प्रयागराजमध्ये लँण्डिंग करुन शकतो. लवकरच हेदेखील सत्यात उतरणार , असेही गडकरी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
- मुख्यमंत्री ठाकरेंकडून के. चंद्रशेखर राव यांना भोजनाचे निमंत्रण; राजकीय हालचालींना वेग
- “…म्हणून आम्ही काँग्रेस सोडली”, निलेश राणेंचा मोठा खुलासा
- … आणि विराटच्या शब्दावर रोहितने रिव्ह्यू घेतला
- “उद्धव ठाकरेंकडे चाटूगिरी करूनही… “; निलेश राणेंचा नार्वेकर आणि विनायक राऊतांना टोला
- “मेरा यही अंदाज ज़माने को खलता है…”, संजय राऊतांचे सूचक ट्विट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

