मुंबई : आज(१७ फेब्रु.)प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधत टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. तसेच भाजप नेते चंद्रकांत पाटील(Chandrakant patil)यांनी भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांच्या प्रकरणात पडू नये. लोक सोमय्यांची धिंड तर काढतीलच, पण तुमचेही कपडे फाटतील, असा सल्लाही राऊतांनी दिला आहे.
यावेळी बोलत असतांना राऊत म्हणाले की,‘किरीट सोमय्यांनी पवईतील पेरूबाग येथील पुनर्वसनाच्या प्रकल्पात सुमारे ३०० ते ४०० कोटींचा घोटाळा केला असून यासंदर्भात सर्व कागदपत्रं माझ्याकडे आहेत. तसेच यासंदर्भात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे,’ असेही राऊत म्हणाले.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणात पडू नये. बेगाने शादी में नाचू नये. लोक सोमय्यांची धिंड तर काढतीलच, पण तुमचेही कपडे फाटतील,’ असा सल्ला राऊतांनी दिला. तसेच मी जुहूच्या प्लॉटबाबत बोललो होतो. तेही बाहेर येईल. पवईचे मला भेटले. किरीट सोमय्यांच्या हातात चप्पल आहे. तेच स्वत:ला चप्पलेने मारतील. महाराष्ट्रातील लोक त्याची धिंड काढतील. तो पुढे लोकं मागे, तो पुढे लोक मागे असं चित्रं निर्माण होईल. कपडे काढून त्याची धिंड काढणार आहे, असेही राऊत म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
-
मुख्यमंत्री ठाकरेंकडून के. चंद्रशेखर राव यांना भोजनाचे निमंत्रण; राजकीय हालचालींना वेग
-
राजू शेट्टींचे राहुल गांधींना पत्र; म्हणाले, “महाराष्ट्र सरकार मोदींना पाठिंबा…”
-
IND vs WI: पर्दापणाच्या सामन्यातच रवी बिष्णोई ठरला “मॅन ऑफ द मॅच’
-
“हवेत सरकार चालवणारे हवेत ‘बस’ चालवूच शकतात”, अतुल लोढेंचा नितीन गडकरींना अप्रत्यक्ष टोला
-
‘किरीट सोमय्या हे फडणवीस, अमित शाह यांच्या नावाने वसुली करतात’ – संजय राऊत

