🕒 1 min read
मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्यांनी (Kirit Somaiya) पवईतील पेरूबाग येथील पुनर्वसनाच्या प्रकल्पात सुमारे ३०० ते ४०० कोटींचा घोटाळा केला आहे. त्याबाबतची कागदपत्रं माझ्याकडे आहेत. एक दोन नाही ट्रकभरून कागदपत्रे माझ्याकडे आहेत. ही सर्व कागदपत्रं मी आर्थिक गुन्हे शाखेकडे देणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
पुढे बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, सोमय्यांची एकूण २११ प्रकरणे माझ्याकडे आली आहेत. त्यांनी एकूण सात साडेसात हजार कोटींचा हा घोटाळा केला आहे. त्यांनी खुशाल माझ्याविरोधात कोर्टात जावं, असं आव्हानच त्यांनी दिलं आहे. तसेच चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी या प्रकरणात पडू नये, असा सल्ला देखील संजय राऊत यांनी पाटलांना दिला आहे.
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावाने कोट्यवधी रुपये वसूल केले आहेत. मी आता मुख्यमंत्र्यांना भेटायला चाललो आहे. काय चाललं होतं या महाराष्ट्रात? मी सोमय्यांची रोज एक भ्रष्टाचाराची प्रकरणे काढणार आहे. तसेच फडणवीसांना या घोटाळ्याची माहिती असेल असं मला वाटत नाही. दिल्लीतील काही मंत्र्यांच्या नावावर शहांच्या नावावर धमक्या देऊन पैसे काढले आहेत, असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
“हवेत सरकार चालवणारे हवेत ‘बस’ चालवूच शकतात”, अतुल लोढेंचा नितीन गडकरींना अप्रत्यक्ष टोला
-
IND vs WI: पर्दापणाच्या सामन्यातच रवी बिष्णोई ठरला “मॅन ऑफ द मॅच’
-
राजू शेट्टींचे राहुल गांधींना पत्र; म्हणाले, “महाराष्ट्र सरकार मोदींना पाठिंबा…”
-
मुख्यमंत्री ठाकरेंकडून के. चंद्रशेखर राव यांना भोजनाचे निमंत्रण; राजकीय हालचालींना वेग
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
