Share

राज्यातील कोरोना निर्बंध शिथिल होणार का? अजित पवारांनी दिली महत्वाची माहिती

Published On: 

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील कोरोना निर्बंधाबाबत मोठी माहिती दिली आहे. देशासह राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने केंद्राने बुधवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोना निर्बंध संपवण्यास सांगितले आहे. आता राज्यातील निर्बंधही हटणार का? असा प्रश्न यावेळी निर्माण झाला आहे. यावरच अजित पवारांनी (Ajit Pawar Explanation) माहिती दिली आहे.

” काल केंद्र सरकारकडून जो आढावा आला, त्यात कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्याचे दिसून आले. हे सातत्य टिकेल तरच राज्यातील निर्बंधात शिथिलता येईल. आणि याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील.”, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान निर्बंध हटवण्याबाबत केंद्राने राज्यांना पत्र लिहिले असून, आता कोरोना रुग्णसंख्येत सातत्य राहिले, तरच निर्बंधाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे अजित पवर्णी स्पष्ट केले आहे. दरम्यान यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष निवडणूकीवरही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “माझ्या माहितीप्रमाणे आज काँग्रेसचे मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत.अनेक पक्ष एकत्र येतात तेव्हा म्हणणे वेगळं असते. कुठलाही पक्षावर अन्याय होणार नाही. राज्याचे हित सांभाळले जाईल”

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!