मुंबई : फ्रेंच ओपन टेनीस स्पर्धेतून जापानची नाओमी ओसाका या महिला टेनीसपटुने माघार घेतली. पहिल्या फेरीतील विजयानंतर पत्रकार परीषदेला हजेरी न लावल्यामुळे या स्पर्धेच्या आयोजकांनी तिच्यावर ११ लाख रुपयांचा दंड ठोठावला. ही कारवाई होताच नाओमीने स्पर्धेतून माघार घेतली.
या प्रकरणावर भारतीय महिला क्रिकेटपटु मिताली राजने तिची प्रतिक्रीया दिली आहे. नाओमी प्रमाणे माध्यमाशी दुर होण महिला क्रिकेटरला जमणार नाही. कारण महिला क्रिकेटपटुंना माध्यमांची गरज आहे. माध्यमांच्या पाठीब्यांने महिला क्रिकेटचा विकास शक्य आहे. त्यामुळे मला व्यक्तिश: एखादी पत्रकार परिषद चुकली पाहिजे असे वाटत नाही.’ अशी प्रतिक्रिया मिताली राजने दिली. यावेळी बोलताना तिने बायोबबलमध्ये राहणे खरच कठीण असल्याचेही मान्य केले.
मागील काही वर्षापासुन मानसीक त्रासातुन जात असल्याने नाओमी ओसाकाने फ्रेंच ओपन स्पर्धेत सहभागी होण्याआधी घोषणा केली होती की, ती कोणत्याही पत्रकार परिषदेला उपस्थिती लावणार नाही. तिने तिचे म्हणणे खरे करुन दाखवले. पहिल्या फेरीतील विजयानंतर नाओमी पत्रकार परिषदेला अनुपस्थीत राहिली. यानंतर प्रायोजकाने कारवाई करत तील ११ लाखांचा दंड ठोठावला. महत्वाची बाब म्हणजे जपानची नाओमी ओसाकाही जगातील दुसर्या क्रमांकाची महिला टेनिसपटू आहे.
महत्वाच्या बातम्या
- चीनमध्ये आता तीन मुलांना जन्म देण्याची परवानगी, सरकारच्या निर्णयाचे नागरिकांनी केले स्वागत
- ‘उद्धवजी… जर शेतकऱ्यांना काही देऊ शकत नसाल तर किमान मारु तरी नका’
- ‘ओबीसी समाजावर अन्याय होत असताना भुजबळ, वड्डेट्टीवार हे नेते मात्र सत्तेत रममाण झाले’
- ‘सत्ता येणार… सत्ता येणार असे बोलून भाजपचे नेते जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत’
- कोरोनामुळे अनाथ झालेले एकही मुल मायेच्या आधाराला पारखे राहू नये – सुप्रिया सुळे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

