Share

‘त्या’ उद्यानाला ‘साध्वी सावित्रीबाई फुले’ नाव देणाऱ्यांचा हेतू चांगला होता- प्रा. हरी नरके

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पुण्यातील ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाजवळील उद्यानाला ‘साध्वी सावित्रीबाई फुले’ असे नाव देण्यात आले होते. 1991 साली कॉंग्रेसमधील सार्वजनिक बांधकाम मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते या उद्यानाची कोनशीला बसवली गेली होती. सावित्रीबाईंचा उल्लेख साध्वी असा करण्याला तब्बल तीस वर्षानंतर आक्षेप घेण्यात आला. पुण्यातील प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी एका फेसबुक पोस्ट द्वारे पुणे महानगर पालिकेवर हा आक्षेप नोंदवला होता. ‘आदर्श व्यक्तींचे दैवतीकरण व हिंदुत्ववादी विशेषणे लावून धार्मिकीकरण करणे चुकीचे वाटते.’ अशी भावनिक पोस्ट करत त्यांनी साध्वी हा शब्द काढून टाकण्याची विनंती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना केली होती.

यानंतर आता समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत उद्यानाला देण्यात आलेल्या सावित्रीबाई फुलेंच्या नावापुढील साध्वी हे विशेषण हटवले आहे. समता दलाच्या कार्यकर्त्यांनी सावित्रीबाईंच्या नावाच्या आधी असलेला साध्वी हा उल्लेख झाकून टाकला आहे. त्यांनी निळ्या शाईने साध्वी हे नाव झाकून टाकलं आहे. आता प्रा. हरी नरके यांनी फेसबुक पोस्ट करत याला उत्तर दिले आहे.

ज्यांनी १९९१ साली नाव दिले त्यांना त्यागी, निस्वार्थी वृत्तीने काम करणाऱ्या सावित्रीबाई अभिप्रेत होत्या. त्याकाळात क्रांतीज्योती वा ज्ञानज्योती हे शब्द फारसे प्रचलित नव्हते. ज्यांनी हे नाव दिले त्यांचा हेतू चांगला होता. त्यावेळचा सांस्कृतिक संदर्भ तुम्हाला आवडो अगर न आवडो, पण हा ठराव देणारे लोक भले आहेत, त्यांनीच जेव्हा सावित्रीबाईंना सगळे विसरले होते तेव्हा त्यांचे स्मरण कायम ठेवले हे विसरून कसे चालेल?, असं हरी नरके म्हणाले आहेत.

आज साध्वी शब्दाला विपरीत अर्थ प्राप्त झालेला असला तरी तेव्हा तो तसा नव्हता. शिवाय पारंपरिक शब्द टाळण्याइतके बहुजन काटेकोर नव्हते. दक्ष नव्हते. त्यांचे सांस्कृतिक भान तेव्हाही आजागृत होते आणि आजही त्यात फारसा फरक पडलेला नाही. विरोध करणारे सापसाप म्हणत भुई धोपटत सुटले. दुसरी बाजू समजून न घेता आरोप करणे, जजमेंटल होणे टाळता येणार नाही काय ? असाही प्रा. हरी नरके यांनी फेसबूकच्या पोस्टमध्ये उल्लेख केला आहे.

हरी नरके यांनी जरी या प्रकरणाची दुसरी बाजू लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला असला तरी या प्रकरणावरून आणखी वाद होऊ नये अशी फक्त अपेक्षाच आपण बाळगू शकतो.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!