🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट तयार करून, राज्यात सरकार स्थापन केल्यापासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. सत्ताधारी नेते शिवसेना पक्षातील नेत्यांना टार्गेट करत असल्याचं पाहायला मिळतं आहे. याच पार्श्वभूमिवर भारतीय जनता पार्टीचे आमदार राम सातपुते यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला शिवसेना पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी सातपुते यांच्यावर पलटवार केला आहे.
आदरणीय नेत्यांचा असा घोर अपमान करणारे राज्यकर्ते भाजपचे अलंकार झालेत. हे कसले राम, हे तर हराम, असं म्हणत अरविंद सावंत यांनी राम सातपुते यांच्यावर चांगलाच हल्ला केला आहे. अरविंद सावंत यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून यासंबंधी एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी हे सगळं लिहिलं आहे.
तसेच अरविंद सावंत यांनी या सगळ्या प्रकरणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. कोण हे राम सातपुते. भाजपचे आमदार का? काय त्यांची भाषा, हेच का भाजपचे हिंदुत्वाचे संस्कार. देवेंद्र फडणवीसजी यांच्यावर कारवाई करून दाखवा, नाहीतर रामराज्याची भाषा करू नका, असं सावंत यांनी म्हटलं आहे.
कोण हे राम ! सातपुते.. भाजपचे आमदार का? काय त्यांची भाषा, हेच का भाजपचे हिंदुत्वाचे संस्कार! आदरणीय नेत्यांचा असा घोर अपमान करणारे राज्यकर्ते भाजपचे अलंकार झालेत.
हे कसले राम, हे तर हराम. यांच्यावर कारवाई करून दाखवा, नाहीतर @Dev_Fadnavis जी रामराज्याची भाषा करू नका.@AUThackeray pic.twitter.com/2EysmbOfeb— Arvind Sawant (@AGSawant) August 22, 2022
दरम्यान, राम सातपुते यांनी त्यांच्या आकाऊटंवरून एक ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यामध्ये त्यांनी आधी फाटलेल्या चड्डीला ठिगळ लावा. उगाच आभाळ हेपलायचे धंदे बंद करा, असं म्हटलं होतं.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena। आत्महत्येच्या टोकावर शेतकरी; कुठे फेडणार हे पाप?; शिवसेनेचा सरकारला आक्रमक सवाल
- Sanjay Shirsat| “अतुल सावे यांनी मंत्री होण्याआधीच एकनाथ शिंदे यांच्याकडून 50 कोटी आणले”, – संजय शिरसाट
- राष्ट्रगीताला कसं उभं राहावं हे ज्याला कळत नाही, असा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला मिळालाय- विनायक राऊत
- Uddhav Thackeray । आमच्याकडे शिवसैनिकांच्या निष्ठेचे खोके! उद्धव ठाकरेंचा गद्दारांना टोला
- महाराष्ट्रात काळू-बाळू यांचा तमाशा सुरू आहे, एक दाढी वाला आणि एक बिनदाधीवाला- विनायक राऊत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
