Share

Sanjay Shirsat| “अतुल सावे यांनी मंत्री होण्याआधीच एकनाथ शिंदे यांच्याकडून 50 कोटी आणले”, – संजय शिरसाट

Published On: 

औरंगाबा : भाजप मंत्री अतुल सावे यांनी मंत्री होण्याआधीच एकनाथ शिंदे यांच्याकडून 50 कोटी रुपये आणल्याचं वक्तव्य शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी केलं आहे. रविवारी, 21 ऑगस्ट रोजी, झालेल्या औरंगाबाद येथील मतदार संघात रस्त्याच्या कामाच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी शिरसटांनी एकनाथ शिंदे यांचं भरभरून कौतुक केलं.

संजय शिरसाट यांच्या भावनाः

अतुल सावे यांना सांगतो की आज तुम्ही मंत्री आहात त्याचा शहराला किती उपयोग होईल हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. दर आठवड्याला पंधरा दिवसांनी एक बैठक आणि झालेल्या कामाचा आढावा घेण्याचं काम आपलं असलं पाहिजे. अतुल सावे शहराचे नागरिक आहेत ते महाराष्ट्राचे मंत्री असले तरी या शहराचे नागरिक पहिलं आहेत. त्यामुळे बोलवलेल्या प्रत्येक माणसाच्या घरी जाणं त्यांचं काम आहे. ते सर्व मंत्र्यांनी केलं पाहिजे. अशी माझी भावना असल्याचा संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

एकमेकांची चेष्टा करून अथवा एकमेकांविरोधात बोलून कधी तुमचं महत्त्व वाढत नाहीः

आपली भावना व्यक्त करत असताना, मी केलेला रस्ता म्हणण्यापेक्षा आम्ही आमच्या मतदारसंघासाठी काय केलं याला महत्त्व असलं पाहिजे, संजय शिरसाट म्हणाले. तसेच एकमेकांची चेष्टा करून अथवा एकमेकांविरोधात बोलून कधी तुमचं महत्त्व वाढत नाही आणि तुमचं महत्त्व वाढवायचं असेल तर त्याला कामाची जोड असली पाहिजे, असं देखील शिरसाटांनी नमूद केलं.

अतुल सावेंनी मंत्री होण्याआधीच एकनाथ शिंदे कडून 50 कोटी रुपये आणलेः

अतुल सावेंनी मंत्री होण्याआधीच एकनाथ शिंदे कडून 50 कोटी रुपये आणल्याचं शिरसाटांणी यावेळी स्पष्ट केलं. मात्र या ठिकाणी निधीची कोणती कमतरता पडणार नाही, आम्ही मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी मुख्यमंत्री शिंदे कडे गेलो होतो. शिंदे यांची कामाची पद्धत वेगळी असून ती अतुल यांनी देखील पाहिले असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटं आहे. कितीही पत्र आणा शिंदे तातडीने मान्यता देतात मी सातारा देवळामध्ये जवळपास 70-80 कोटी रुपयांचं काम केलं आहे. अतुल साहेबांनी कामाचा पत्र दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी लगेचच स्वाक्षरी केली होती असं शिरसाटांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्याः

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!