Share

“ज्यांच्या दुधातच आहे पाणी त्यांची…”, शरद पवारांवर केलेल्या टीकेवरून रोहित पवारांचा सदाभाऊंना टोला

Published On: 

मुंबई: रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) सध्या सोलापूर दौऱ्यावर असून त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधत शरद पवारांनी आयुष्यभर आग लावायचेच काम केले असून त्यांचे आडनाव आता पवार ऐवजी आगलावे असे करावे, असा घणाघात केला. यावरच राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (rohit pawar) यांनी सदाभाऊ यांना ट्वीट करत टोला लगावला आहे.

“ज्यांच्या दुधातच आहे पाणी त्यांची कशी असेल शुद्ध वाणी?”, असे ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे. सोबतच त्यांनी सदभाऊ यांचा एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. ज्यात सदाभाऊ म्हणत आहे की, “मला माहितिये की, दूध कसं ओतलं जातं, त्यात दूध किती असतं, त्यात पाणी किती असतं, ते कसं ओतलं जातं, याच्यातूनच मी पुढे आलेलो आहे.”

नेमके सदाभाऊ खोत काय म्हणाले?

शरद पवार हे महान नेते असले तरी त्यांनी राज्यात काड्या करण्याशिवाय काहीच केले नाही. त्यांनी जाईल तिथे आग लावायची आणि पुढच्या घरात आग लावायला निघून जायचे काम केले. मला वाटते शरद पवार यांचे आडनाव आता पवार ऐवजी आगलावे असे करावे. हे राज्य एवढे होरपळून निघाले आहे की, ते आता थांबले पाहिजे. असे सदाभाऊ खोत म्हणाले आहेत. दरम्यान सदाभाऊ यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीकडून अएक संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

हिंदू सणांना परवानगी देण्‍याचा विषय आला की ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?- आशिष शेलार

आलिया-रणबीरचा साधा विवाहसोहळा; फोटो होतोय व्हायरल

सदाभाऊंच्या ‘त्या’ वक्तव्यावर अमोल मिटकरींचा पलटवार; म्हणाले, “शरद पवारांवर बोलताना सुर्यासमोर…”

विल स्मिथच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओवर सलमान खान म्हणाला…

IPL 2022 : “गौतम दादानं मला…”, गुजरातविरुद्धच्या शानदार खेळीनंतर ‘बेबी एबी’ आयुषनं मानले गंभीरचे आभार!

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!