मुंबई: रयत क्रांतीचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) सध्या सोलापूर दौऱ्यावर असून त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निशाणा साधत शरद पवारांनी आयुष्यभर आग लावायचेच काम केले असून त्यांचे आडनाव आता पवार ऐवजी आगलावे असे करावे, असा घणाघात केला. यावरच राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
“शरद पवारांवर बोलताना आपण एवढ्या महान सुर्यासमोर बोलत आहोत तिकडे थुंकण्याचा प्रयत्न केला तर थुंकी आपल्या तोंडावर उडते इतकं ज्ञान सदाभाऊंना असावं. सदाभाऊंना पुढील आमदारकी टिकवायची आहे. सदाभाऊ किंवा त्यांचा मित्र हे स्वत: बोलत नाहीत. यांचे मास्टरमाइंड देवेंद्र फडणवीस आहेत असं माझं स्पष्ट मत आहे.” असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
तसेच आग लावण्याचं भारतातील काम भाजप करत असून ते शरद पवारांचं नाव घेत आहेत. भाजपपासून महाराष्ट्राला धोके निर्माण झाले आहेत. आग कोण लावत आहे हे सर्वांना माहिती आहे. सदाभाऊंच्या बोलण्याला पक्षात काही महत्व नाही. पुढील आमदारकी भेटावी यासाठी त्यांची ही धडपड असल्याचा टोलाही अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.
नेमके सदाभाऊ खोत काय म्हणाले?
शरद पवार हे महान नेते असले तरी त्यांनी राज्यात काड्या करण्याशिवाय काहीच केले नाही. त्यांनी जाईल तिथे आग लावायची आणि पुढच्या घरात आग लावायला निघून जायचे काम केले. मला वाटते शरद पवार यांचे आडनाव आता पवार ऐवजी आगलावे असे करावे. हे राज्य एवढे होरपळून निघाले आहे की, ते आता थांबले पाहिजे. असे सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
“…मग निर्णय झाला नाही असे का म्हणता?”, अशोक चव्हाणांच्या वक्तव्यावर केशव उपाध्येंची प्रतिक्रिया
IPL 2022 : आज सनरायर्झसमोर रॉयल्सचं आव्हान; रेकॉर्ड पाहिला तर ‘हा’ संघ ठरणार विजेता!
“देशातील लोकशाही धोक्यात आहे, भाजपविरोधात एकत्र या”- ममता बनर्जींचे मुख्यमंत्र्यांना पत्रं
भाजप-सेना युती होणार का?; आदित्य ठाकरे म्हणाले, “तुमच्यावर कोणी अन्याय करत असेल…”
IPL 2022 : भावानंच काढला भावाचा काटा..! मग हार्दिकच्या पत्नीनं दिली ‘अशी’ रिअॅक्शन; पाहा VIDEO
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

