Share

IPL 2022 : “गौतम दादानं मला…”, गुजरातविरुद्धच्या शानदार खेळीनंतर ‘बेबी एबी’ आयुषनं मानले गंभीरचे आभार!

Published On: 

मुंबई: IPL 2022 मध्ये नव्याने सामील झालेले लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या दोन्ही संघांत काल (२८ मार्च) पहिला सामना झाला. लखनऊने प्रथम फलंदाजी करताना 5 गड्यांच्या मोबदल्यात 158 धावा केल्या पण गुजरात संघाने दोन चेंडू बाकी असताना 5 बाद 161 धावा करून सामना जिंकला. या सामन्यात खास ठरला तो नवोदित खेळाडू आयुष बडोनी आणि त्याने केलेला विक्रम. गुजरातविरुद्धच्या शानदार खेळीनंतर त्याला कर्णधार के.एल. राहुलने ‘बेबी एबी’ ही पदवी दिली. मात्र सामना संपल्यानंतर त्याने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत माजी खेळाडू तथा लखनऊ सुपर जायंट्सचा मेंटॉर गौतम गंभीर याचे आभार मानले.

आयुष बडोनी म्हणाला की, “गौतम भैय्याने मला खूप मदत केली. त्याने मला माझा नैसर्गिक खेळ खेळायला सांगितले. त्याने मला गोलंदाजाला नाही तर चेंडू खेळायला सांगितले. तो मला म्हणाला की, मी संघात योग्य धावा घेईन. तुला याची गरज नाही. परिस्थितीनुसार खेळा, संघात असे करण्यासाठी वरिष्ठ खेळाडू आहेत, म्हणून तुम्ही फक्त तुमचा नैसर्गिक खेळ खेळा.” दरम्यान आयुष बडोनी आयपीएलच्या इतिहासातील पहिला खेळाडू ठरला ज्याने पदार्पणातच 6 व्या क्रमांकावर किंवा त्याखालील फलंदाजी करताना अर्धशतक ठोकले आहे.

दरम्यान लखनऊचा कर्णधार केएल राहुल (Captain Rahul)आयुष बडोनीच्या (Ayush Badoni) खेळीमुळे खूश होत म्हणाला की, “आयुष बडोनी आमच्यासाठी बेबी एबी (डिव्हिलियर्स) आहे. पहिल्या दिवसापासून तो हुशार होता. नवीन खेळाडूसाठी हे सोपे नव्हते. तो चौफेर शॉट्स खेळतो. मी त्याच्यासाठी खूप आनंदी आहे कारण त्याने संधी साधली. चार विकेट्सनंतर अशी इनिंग खेळणे सोपे नव्हते, पण दबावाखाली त्याने चांगली कामगिरी केली आहे.” आयपीएल सामन्यात शानदार अर्धशतक झळकावणारा आयुष बडोनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्लीकडून खेळतो. श्रीलंकेविरुद्धच्या अंडर-19 सामन्यातही त्याने 185 धावांची इनिंग खेळली आहे. तर आयुष हा आयपीएल पदार्पणात अर्धशतक करणारा श्रीवत्स गोस्वामी आणि देवदत्त पडिक्कल यांच्यानंतरचा तिसरा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे.

महत्वाच्या बातम्या:

“…मग निर्णय झाला नाही असे का म्हणता?”, अशोक चव्हाणांच्या वक्तव्यावर केशव उपाध्येंची प्रतिक्रिया

IPL 2022 : आज सनरायर्झसमोर रॉयल्सचं आव्हान; रेकॉर्ड पाहिला तर ‘हा’ संघ ठरणार विजेता!

“देशातील लोकशाही धोक्यात आहे, भाजपविरोधात एकत्र या”- ममता बनर्जींचे मुख्यमंत्र्यांना पत्रं

भाजप-सेना युती होणार का?; आदित्य ठाकरे म्हणाले, “तुमच्यावर कोणी अन्याय करत असेल…”

IPL 2022 : भावानंच काढला भावाचा काटा..! मग हार्दिकच्या पत्नीनं दिली ‘अशी’ रिअ‍ॅक्शन; पाहा VIDEO

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!